Achira News Logo
Achira News

तेरे नाम चित्रपट पुन्हा प्रदर्शितः 23 वर्षांनंतर एक कल्ट क्लासिक पुनरागमन

Lokmat
तेरे नाम चित्रपट पुन्हा प्रदर्शितः 23 वर्षांनंतर एक कल्ट क्लासिक पुनरागमन
Full News
Share:

Tere Naam Movie Re-release:गेल्या काही वर्षात जुन्या चित्रपटांचा ट्रेंड सुरु झाला आहे. प्रेक्षकांच्या आग्रहास्तव हे चित्रपट पुन्हा प्रदर्शित केले जातात. अशातचबॉलिवूडमधीलसर्वाधिक गाजलेला एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं नाव तेरे नाव. व्हेलेंटाईन वीकचे औचित्य साधत कल्ट क्लासिकसिनेमाजवळपास २३ वर्षानंतर हा चित्रपट थिएटरमध्ये रि-रिलीज करण्यात येणार आहे.त्यामुळे आता सिनेरसिक प्रचंड उत्सुक झाले आहेत. २००३ साली आलेला तेरे नाम हासलमान खानच्याकरिअरमधील गाजलेल्यासिनेमांपैकीएक सिनेमा आहे. या चित्रपटामुळे सलमान खऱ्या अर्थानंबॉलिवूडमधीलसुपरस्टार झाला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या चित्रपटातसलमान खाननेराधे भैय्या नावाची भूमिका साकारली होती. तर अभिनेत्री भूमिका चावला त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली. प्रेमकहाणीवर आधारित हा सिनेमा त्याकाळी प्रचंड गाजला होता. १२ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने त्यावेळेस २५ कोटींपेक्षा अधिक कमाई करत विक्रम रचला होता. आता २३ वर्षानंतर हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी पुन्हा एकदा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. आणखी दोन चित्रपटही होणार रि-रिलीज तेरे नाम सोबतच व्हेलेंटाईन वीकमध्ये आणखी दोन गाजलेले सिनेमे रिलीज होणार असल्याची माहिती समोर आली आहे. हे चित्रपट म्हणजे 'देवदास' आणि 'युवा' आहेत. २००२ मध्ये प्रदर्शित झालेला शाहरुख खान, माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय स्टारर देवदास हा चित्रपट ६ फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट २४ वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

तेरे नाम चित्रपट पुन्हा प्रदर्शितः 23 वर्षांनंतर एक कल्ट क्लासिक पुनरागमन | Achira News