Achira News Logo
Achira News

तेल डेपोवर इराणच्या ड्रोन हल्ल्याच्या आरोपानंतर बहरीनने आणीबाणी जाहीर केली

Pudhari
तेल डेपोवर इराणच्या ड्रोन हल्ल्याच्या आरोपानंतर बहरीनने आणीबाणी जाहीर केली
Full News
Share:

बहरीनमध्ये आज रात्री राष्ट्रीय आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली. संयुक्त अरब अमीरातने सोमवारी सांगितलं की एका इराणी ड्रोनने फुजैराहमधील तेल साठ्याला आग लावली. हे केंद्र होर्मुझ स्ट्रेटला बायपास करणाऱ्या एका महत्वपूर्ण पाईपलाईन हब आहे. यानंतर ब्रिटीश लष्कराने देखील अमीरातच्या समुद्र किनाऱ्यावर एका मालवाहू जहाजाला आग लागल्याची माहिती दिली. या हल्ल्यानंतर ग्लोबल मार्केटमध्ये तेलाच्या किंमती ६ टक्क्यांनी वाढल्या. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी मात्र या हल्ल्यामागे इराणचा हात असल्याचा नकार दिला. त्यांनी अमेरिका आणि युएईच्या दलदलीत पुन्हा जाण्यापासून वाचलं पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली. या राजनैतिक संकटावर लष्करी समाधान निघू शकत नाही हा प्रश्न फक्त वाटाघाटीद्वारेच सोडवला जाऊ शकतो असं देखील मत त्यांनी व्यक्त केलं.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

तेल डेपोवर इराणच्या ड्रोन हल्ल्याच्या आरोपानंतर बहरीनने आणीबाणी जाहीर केली | Achira News