भोजराम तिजारे कमी पाणी, कमी बियाणे आणि कमी खर्चात भरघोस उत्पादन घेण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवणाऱ्या भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील मुंढरी बुज येथील प्रगतिशीलशेतकरीविजय मोहनराव भोयर यांनी तुषार सिंचन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हरभऱ्याचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. तीन एकर क्षेत्रात केवळ ९० किलो बियाणे वापरून अवघ्या २० दिवसांत तयार झालेल्या पिकाने जुना विक्रम मोडून काढला असून, एकूण ४१ क्विंटल हरभरा उत्पादन हाती आले आहे. ही यशकथा इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायक ठरली आहे. तुषार सिंचन तंत्रज्ञानाचा वापर करून केलेल्या लागवडीत पाण्याचा आणि खतांचा योग्य वेळी, योग्य प्रमाणात वापर केला. यामुळे पिकाची वाढ जलद झाली आणि उत्पादनात मोठी वाढ झाली, तालुका कृषी अधिकारी शेताला भेटी देऊन मार्गदर्शन केले, ज्यामुळे हा प्रयोग यशस्वी झाला. तीन एकरांसाठी केवळ ४५ हजार रुपयांचा खर्च आला, तर एकूण विक्रीतून दोन लाख रुपये मिळाले. म्हणजेच, शुद्ध नफा एक लाख ४५ हजार रुपये ! ही गणिते पाहता, कमी गुंतवणुकीत जास्त फायदा कसा मिळवायचा हे विजय भोयर यांनी दाखवून दिले आहे. तुषार सिंचनाचे शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण या उदाहरणाने शेतकऱ्यांना कमी संसाधनांतही मोठे यश मिळवता येईल हे सिद्ध झाले आहे. तुषार सिंचनासारख्या तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास पाण्याची बचत होऊन उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण होईल. अधिक उत्पादनामुळे शेतकऱ्यांत उत्साह मुंढरी परिसरातीलशेतकरीया यशामुळे उत्साही झाले असून, रब्बी हंगामात तुषार सिंचनाचा वापर करून हरभऱ्याचे मोठे उत्पादन घेण्यासाठी तयार होत आहेत. विजय भोयर यांच्या या यशामुळे आधुनिक शेती तंत्रज्ञान ग्रामीण भागात लोकप्रिय होत आहे. यासाठी वेळोवेळी कृषी विभागाकडून मार्गदर्शनाने उन्नतीचा मार्ग मिळाला आहे. तुषार सिंचनावर पूर्ण विश्वास आहे. कमी पाण्यात, कमी बियाण्यांतून भरपूर उत्पादन मिळवता येते. सर्वसामान्य शेतकऱ्यांनीही ही पद्धत अवलंबून हरभऱ्याचे उत्पादन वाढवावे.- विजय भोयर, प्रगतिशील शेतकरी, मुंढरी बुज. हेही वाचा : 'व्हाइट कॉलर' नोकरी सोडून उभे केले दुग्ध व्यवसायाचे साम्राज्य; जाणून घ्या काय आहे विशाल यांची यशकथा
तुषार सिंचन तंत्रज्ञानाद्वारे भुईमुगाचे विक्रमी उत्पादन साध्य
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.