Achira News Logo
Achira News

थकबाकी वाढल्याने दंडाचा कर माफ करण्याची नगरसेवकांची मागणी

Pudhari
थकबाकी वाढल्याने दंडाचा कर माफ करण्याची नगरसेवकांची मागणी
Full News
Share:

ते म्हणाले, शास्ती करामुळे नगरपालिकेच्या थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे, त्यामुळे शासनाने हा कर पूर्णपणे माफ करावा. याला नगरसेवक एल. एन. शहा यांनी अनुमोदन दिले. यावर शिवसेनेचे नगरसेवक आनंदराव पवार व भाजपचे राजवर्धन पाटील यांनी, असा ठराव आम्ही यापूर्वीच शासनाला पाठवला आहे. तुम्ही वेगळे काय केले? असा सवाल उपस्थित करत जनतेला आश्वासन दिल्याप्रमाणे पालिकेनेच शास्ती कर माफ केला पाहिजे, अशी भूमिका मांडली. यावर, तुम्ही सर्वांनी साथ दिली तर आम्ही तो शासनाकडून माफ करून आणतो, असे नगराध्यक्ष मलगुंडे म्हणाले.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

थकबाकी वाढल्याने दंडाचा कर माफ करण्याची नगरसेवकांची मागणी | Achira News