Thalapathy Vijay Tvk Win :तामिळनाडूविधानसभा निवडणुकीतथलापती विजयनेऐतिहासिक विजय मिळवत नवा इतिहास रचला. राज्यातील जनतेनं, विजयच्या TVK पक्षाला १०८ जागांवर दणदणीत विजय मिळवून दिला. अनेक वर्षांपासूनतामिळनाडूच्याराजकारणावर वर्चस्व गाजवणाऱ्या DMK आणि AIADMK ला जोरदार धक्का बसला आहे. एमके स्टालिन यांची केवळ हातातून सत्ता निसटली नाही तर, स्वत: देखील कोलाथूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक हरले. आता विजय हा तामिळनाडूचा मुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता आहे. विजयच्या दणदणीत विजयानंतर राजकीय आणि मनोरंजन विश्वातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. यातच लोकप्रिय दिग्दर्शकराम गोपाल वर्मांनीएक विजयचा एक खास फोटो शेअर केला आहे. राम गोपाल वर्मायांनी त्यांच्या 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर विजयचा दिवंगत महान राजकारणी आणि माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्यासोबतचा एक दुर्मिळ फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये एका कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी करुणानिधी दिसत आहेत, तर त्यांच्या अगदी मागे तरुण विजय उभा आहे. हा फोटो शेअर करताना वर्मा यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, "कळैगनार (करुणानिधी) यांनी कधी कल्पनाही केली नसेल की, त्यांच्या मागे उभा असलेला हा मुलगा एके दिवशी त्यांचा पक्ष (DMK) उद्ध्वस्त करेल". राम गोपाल वर्मा यांची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. Kalaingar wouldn’t have dreamed that the kid behind him would one day destroy his party 🙏👍🔥pic.twitter.com/7NNp6Ge73S दरम्यान, विजयचा राजकारणातील उदय हा केवळ त्यांच्या स्टारडमचा परिणाम नसून, मागील १५ वर्षांच्या सखोल आणि नियोजनबद्ध कामाचा परिणाम आहे. आपल्या फॅन क्लब्सना संघटित करून मजबूत राजकीय आधार तयार करण्याच्या रणनीतीमुळेच TVK ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करत आहे. सुपरस्टार विजयनं २०२४ मध्ये तमिळगा वेत्री कळगम (TVK) नावाच्या पक्षाची स्थापना केली. त्यानंतर विक्रवंडी येथे झालेल्या पहिल्या सभेत तब्बल ८ लाखांची गर्दी जमवली. सुरुवातीला ही गर्दी केवळ सुपरस्टारच्या लोकप्रियतेचा परिणाम मानली गेली, मात्र २०२६ च्या निवडणूक निकालांनी या आकलनाला पूर्णपणे खोटे ठरवले.
थलापती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत इतिहास रचला
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.