मुंबई -' ठरलं तर मग ' मालिकेमध्ये सध्या स्टार प्रवाहच्या १३ नायिका म्हणून प्रियाचे 'तीन-तेरा' वाजवतायत. काही दिवसांतच प्रियाचा खोटेपणा सुभेदार आणि किल्लेदारांसमोर येणार आहे. प्रिया खोटी तन्वी बनवून सुभेदार आणि किल्लेदारांच्या घरात वावरतेय, हे सत्य सायली आणि अर्जुन मिळून सर्वांसमोर आणणार आहेत. प्रियाचे अफेअर, पूर्णा आजीला दिलेला त्रास, अस्मिताच्या बाळाला संपवण्याचा प्रयत्न, त्याचबरोबर सायलीला जीवे मारण्याचा प्रयत्न असे प्रियाचे कारनामे सुभेदारांसमोर आले आहेत. अशातच आता स्टार प्रवाहनं नुकताच 'ठरलं तर मग' या मालिकेचा प्रोमो शेअर केलाय. यामध्ये सायली प्रियाला हाताला धरून घराबाहेर काढताना दिसतेय.'ठरलं तर मग' मालिकेचा प्रोमोस्टार प्रवाहनं शेअर केलेल्या 'ठरलं तर मग'मालिकेच्याप्रोमोमध्ये सायली प्रियाला चांगलीच चपराक देते आणि म्हणतेय, 'प्रिया या सगळ्यांच्या अश्रूंचा बदला मी घेणार! तुला इतकं मारणार, इतकं मारणार की, मारून-मारून तुला शिक्षा देणार. चल बाहेर हो, तुझ्या सगळ्या पापांची, छोट्या-मोठ्या सगळ्या गुन्ह्यांची तुला शिक्षा होणार! तू तन्वी नाहीयेस हे आता मी सर्वांना सांगणार, ते सुद्धा पुराव्यासकट…' असं म्हणत सायली प्रियाला फरफटत घराबाहेर काढते. त्याचबरोबर पोलीससुद्धा प्रियाला अटक करण्यासाठी आलेले दिसतायत. सायली, प्रियाच्या कानाखालीसुद्धा लागवते.View this post on InstagramA post shared by Star Pravah (@star_pravah)शेवटी सायलीप्रेक्षकांनाउद्देशून म्हणतेय, 'कुठेही जाऊ नका अजून हिशोब बाकीये' स्टार प्रवाह वाहिनीनं मालिकेचा प्रोमो शेअर करत, 'होणार प्रियाचा हिशोब...अखेर सायली वाजवणार प्रियाचे तीन तेरा..' असं कॅप्शन लिहिलं आहे.Dnyanesh Wadekar | रुमाल अन् प्रेमपत्र.. नागराजनं सांगितलं खऱ्या आयुष्यात त्यांचं लग्न कसं ठरलं!प्रोमोवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियाप्रोमोवर नेटकऱ्यांनीहीप्रतिक्रियादेत उत्सुकता दर्शवली आहे. 'ह्याच तर दिवसाची वाट पाहत होतो', 'मस्त मज्जा आली', 'आता तरी खरं समोर येणार', 'एक नंबर' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. त्यामुळे आता 'ठरलं तर मग' मालिकेमध्ये सायली प्रियाचं सत्य सर्वांसमोर आणण्यासाठी काय प्रयत्न करणार आणि प्रिया आणखी नवा डाव रचणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
'थलाल द मॅग'मालिकाः सायलीने बदला घेतल्याने प्रियाचे खोटे उघड
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.