Achira News Logo
Achira News

दुःखाच्या दरम्यान किशोरवयीन मुलाचे धैर्य चमकतेः आईचा अचानक मृत्यू होऊनही 16 वर्षीय मुलीने घेतली परीक्षा

Pudhari
दुःखाच्या दरम्यान किशोरवयीन मुलाचे धैर्य चमकतेः आईचा अचानक मृत्यू होऊनही 16 वर्षीय मुलीने घेतली परीक्षा
Full News
Share:

सईचा तर दहावीचा शेवटचा पेपर होता. अशावेळी शिवडाव विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक व शेजारील नागरिकांनी तिला धीर दिला आणि दहावीच्या परीक्षेचा शेवटचा पेपर देण्याचे मानसिक बळ दिले. आईचा मृतदेह घरात असतानाही सई बुधवारी सकाळी परीक्षा केंद्रावर पोहोचली. साक्षी सावंत यांच्या आकस्मिक निधनाची माहिती मिळाल्यानंतर ओटोसवाडीसह संपूर्ण शिवडाव गावात शोककळा पसरली. त्यातच सई सावंतचा दहावीचा शेवटचा पेपर असल्याने शिवडाव विद्यालयाचे शिक्षक तातडीने तिच्या घरी पोहोचले. दहावीची परीक्षा सुरू असताना कु. सई हिला परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी नेहमी धावपळ व तिची तयारी करणारी आई आज घरात निपचित पडली होती. मात्र या प्रसंगातही अवघ्या १६ वर्षाची कु. सई ही धिराने उभी राहिली आणि परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचली.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

दुःखाच्या दरम्यान किशोरवयीन मुलाचे धैर्य चमकतेः आईचा अचानक मृत्यू होऊनही 16 वर्षीय मुलीने घेतली परीक्षा | Achira News