Achira News Logo
Achira News

दोन राष्ट्रीय काँग्रेस पक्षांचे विलीनीकरणः एक नवीन मार्ग?

Lokmat
दोन राष्ट्रीय काँग्रेस पक्षांचे विलीनीकरणः एक नवीन मार्ग?
Full News
Share:

अजित पुवारांच्या अपघाती निधनानंतर, दोन्हीराष्ट्रवादी काँग्रेसपक्षाच्या विलिनिकरणाच्या चर्चेने अधिकच जोर दरला आहे. दोन्हीराष्ट्रवादी काँग्रेसपक्ष एकत्र यावेत, अशी अजित दादांचीच इच्छा होती, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या नेत्यांकडून वारंवार केला जात आहे. यातच, आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेतेअनिल देशमुखयांनीही यासंदर्भात भाष्य केले आहे. ते नागपूर येथे पत्रकारांशी बोलत होते. अजितदादा हयात असताना विलिनीकरणासंदर्भात अनेक बैठका पार पडल्या. साधारण किती बैठका पार पडल्या? त्या संदर्भात आमच्या काही कानावर नाही, अशा पद्धतीची वक्तव्ये समोर येत आहेत. तुम्ही प्रत्यक्ष काही बैठकांमध्ये उपस्थित होता का आणि किती बैठका नेमक्या पार पडल्या? असे विचारले असता देशमुख म्हणाले, "अजितदादांबरोबर जवळजवळ चौदा बैठका झाल्या. अनेक बैठकांना मीही उपस्थित होतो. आमचे बाकी सहकारीसुद्धा होते. पण आता यासंदर्भात सध्या तरी दुखवट्याचा काळ सुरू आहे. हा दुखवटा संपल्यानंतर आम्ही सविस्तरपणे, कोणत्या तारखेला बैठक झाली अजित दादांबरोबर? किती वाजता बैठक झाली? त्या बैठकीला कोण कोण होतं? त्या बैठकीमध्ये काय ठरलं? या सर्व गोष्टी सांगू." "सुप्रिया सुळे आणि शरद पवार देखील काही बैठकांना उपस्थित होते. त्यामुले सर्वां माहिती आहे त्यांच्या नेत्यांनाही माहीत आहे," असेही देशमुख यांनी सांगितले. यावर,अजित पवारांचीनेमकी खद-खद काय होती? असे विचारले असता देशमुख म्हणाले, "असे आहे की या सर्व गोष्टी दुखवट्याचा काळ संपल्यानंतर सांगू. आता या गोष्टी सांगणे हे योग्य होणार नाही. दुखवट्याच्या काळात अशा गोष्टी टाळल्या पाहिजेत," असे देशमुख म्हणाले.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

दोन राष्ट्रीय काँग्रेस पक्षांचे विलीनीकरणः एक नवीन मार्ग? | Achira News