Achira News Logo
Achira News

दलाई लामाला'मेडिटेशन अल्बम'साठी ग्रॅमी पुरस्कार

Lokmat
दलाई लामाला'मेडिटेशन अल्बम'साठी ग्रॅमी पुरस्कार
Full News
Share:

Grammy Award 2026 Winner Dalai Lama:संगीत विश्वातील अत्यंत प्रतिष्ठित सन्मानांपैकी एक असलेल्याग्रॅमी पुरस्कारांचीघोषणा झाली आहे. दरवर्षीप्रमाणे, यंदाही भारत दावेदार होता, परंतु एकहीग्रॅमी पुरस्कारजिंकता आला नाही. मात्र, या वर्षी 90 वर्षीय आध्यात्मिक गुरूदलाई लामायांनी ग्रॅमी पुरस्कार मिळवला आहे. त्यांना एका अतिशय खास श्रेणीत ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कोणत्या श्रेणीत पुरस्कार? अनेकांना माहिती असेल की,दलाई लामायांचे मनोरंजन क्षेत्राशी खोलवरचे नाते आहे. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. आता, त्यांना संगीत उद्योगातील एका प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दलाई लामा यांना 68 व्या ग्रॅमी पुरस्कारांमध्ये त्यांच्या "मेडिटेशन: द रिफ्लेक्शन्स ऑफ हिज हॉलिनेस द दलाई लामा" या अल्बमसाठी हा सन्मान मिळाला आहे. नोबेल शांतता पुरस्कारासह जगभरातील अनेक सन्मानांनी गौरवण्यात आलेल्या दलाई लामा यांच्या यादीत आता ग्रॅमी अवॉर्डचीही भर पडली आहे. दलाई लामा यांचे मनोरंजनविश्वाशीही जुने नाते आहे. 1997 मध्ये मार्टिन स्कॉर्सेसी दिग्दर्शित ‘Kundun’ चित्रपटात त्यांच्या बालपणाची कथा मांडण्यात आली होती. या चित्रपटाला ऑस्करचे 4 नामांकन मिळाले होते. त्याच वर्षी ब्रॅड पिटचा ‘Seven Years in Tibet’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्यात बॉलिवूड अभिनेता डॅनी डेन्झोंगपा यांचीही भूमिका होती. 2014 मध्ये ‘Dalai Lama Awakening’ ही डॉक्युमेंट्री लोकप्रिय ठरली. तर, 2024 मध्ये ‘Wisdom of Happiness’ ही डॉक्युमेंट्री प्रदर्शित झाली होती, ज्यात स्वतः 14वे दलाई लामा होते. ग्रॅमी 2026 मध्ये भारताची निराशा... या वर्षी पंडित रविशंकर यांची मुलगी अनुष्का शंकर हिला त्यांच्या "डेब्रेक" या गाण्यासाठी ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. मात्र, पुरस्कार मिळू शकला नाही. यापूर्वी तिला विविध श्रेणींमध्ये 11 वेळा नामांकन मिळाले आहे. शंकर महादेवन यांचा फ्यूजन बँड शक्ती, ज्यामध्ये सिद्धांत भाटिया यांचा समावेश होता, यालाही नामांकन मिळाले होते. याशिवाय, भारतीय संगीतातील योगदानाबद्दल संगीतकार चारू सुरी यांनाही ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. मात्र, यावेळी भारताला निराशेचा सामना करावा लागला. आंतरराष्ट्रीय कलाकारांची बाजी यंदाच्या ग्रॅमीमध्ये केंड्रिक लॅमर यांना 9 श्रेणींमध्ये नामांकन मिळाले, त्यापैकी 3 पुरस्कार त्यांनी जिंकले. तर, लेडी गागा 7 नामांकनांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

दलाई लामाला'मेडिटेशन अल्बम'साठी ग्रॅमी पुरस्कार | Achira News