पुणे: ‘‘दलित समाजाची ताकद मोठी असून, कोणाला पाडायचे आणि कोणाला निवडून आणायचे, हे माझ्या हातात आहे. काँग्रेसने महिलांना जसा विरोध केला, तसा मलाही केला होता. शिर्डीमध्ये मला जाणूनबुजून पराभूत केले, म्हणून मी काँग्रेसची साथ सोडून भाजपकडे गेलो आणिभाजपाचीसत्ता आली. त्यामुळे मी भाजपसोबत नाही तर भाजप माझ्यासोबत आहे, असे मी मानतो,’’ असे मत केंद्रीय राज्यमंत्रीरामदास आठवलेयांनी व्यक्त केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने समता भूमी येथे आयोजित केलेल्या 'भारताची भीमज्योत' कार्यक्रमातरामदास आठवलेबोलत होते. यावेळी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित गायकवाड, माजी मंत्री भाई गिरकर, उपमहापौर परशुराम वाडेकर, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी खासदार सुनील गायकवाड, 'रिपाइं'चे शहराध्यक्ष संजय सोनावणे, नगरसेवक अजय खेडेकर, पल्लवी जावळे, मनीषा लडकत आदी उपस्थित होते. आठवले म्हणाले, ‘‘बुद्धाचे तत्त्वज्ञान अंगीकारत बाबासाहेबांनी संपूर्ण मानवजातीचे कल्याण करणारे संविधान देशाला दिले. संविधान कोणीही बदलू शकत नाही. काँग्रेस आणि विरोधी पक्ष केवळ तशा वावड्या उठवत आहे. मी ज्यांच्यासोबत असतो, त्यांची सत्ता आल्याशिवाय राहत नाही. जोवर मी भाजपसोबत आहे, तोवरभाजपाचीसत्ता येणार असून, मला चौथ्यांदा मंत्री होण्याची संधी मिळणार आहे.’’
दलितांची ताकद माझ्या हातात-केंद्रीय मंत्री रामदास आठवले
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.