Achira News Logo
Achira News

दिल्ली उच्च न्यायालयाने राजपाल यादवला चेक बाऊन्स प्रकरणात तुरुंग अधीक्षकांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Maharashtra Times
दिल्ली उच्च न्यायालयाने राजपाल यादवला चेक बाऊन्स प्रकरणात तुरुंग अधीक्षकांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
Full News
Share:

मुंबई: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव याला चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयानं मोठा दणका दिला आहे. दिलेल्या आदेशांचं वारंवार उल्लंघन केल्यासंदर्भात न्यायालयानं कडक शब्दांत ताशेरे ओढत राजपाल यादवला ४ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत संबंधित तुरुंग अधीक्षकांसमोर हजर होण्याचे आदेश दिले आहेत.प्रकरण नेमकं आहे तरी काय?हे प्रकरण मेसर्स मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि राजपाल यादव यांच्यातील आर्थिक व्यवहाराशी संबंधित आहे.मिळालेल्या माहितीनुसार २०१० मध्ये राजपाल यादवनं 'अता पता लापता' या चित्रपटाच्या निर्मितीसाठी ५ कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. व्याजासह ही रक्कम १० कोटींच्या वर गेली होती. या कर्जाच्या परतफेडीसाठी दिलेले चेक बाऊन्स झाल्यामुळं राजपाल यादव आणि त्याच्या पत्नीविरुद्ध कलम १३८ (नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट) अंतर्गत खटला दाखल करण्यात आला होता.राजपाल यादवला यापूर्वी खालच्या न्यायालयानं सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरुद्ध त्यानं उच्च न्यायालयात दाद मागितली होती. जून २०२४ मध्ये, त्यानें थकीत रक्कम परत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर न्यायालयानं त्याच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. मात्र, त्यानंतर झालेल्या अनेक सुनावणींमध्ये राजपाल यादवनं पैसे भरण्यासाठी वेळ मागून घेतला, पण दिलेल्या मुदतीत रक्कम जमा केली नाही.Lagnanantar Hoilach Prem : अखेर तो क्षण आलाच! गैरसमजाची धूळ पुसली जाणार, 'जीवांदिनी' आणि 'काव्यार्थ'च्या नात्याची होणार नवीन सुरुवातन्यायालयानं दिलेली सवलत आणि दाखवलेली सहानुभूती राजपाल यादवनं गृहीत धरली आहे. वारंवार संधी देऊनही अटींचे पालन करण्यात तो अपयशी ठरला आहे, असे निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे.जारण चित्रपटाच्या ट्रेलर लॉंचला अमृताने अनिता दातेची पोल खोललीन्यायालयानं आता स्पष्ट केलंय की, राजपाल यादवनं न्यायालयाच्या प्रक्रियेचा अनादर केला आहे. त्यामुळं त्याला देण्यात आलेले संरक्षण आता काढून घेण्यात येत असून, त्याला उद्या म्हणजेच ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत तुरुंगात हजर व्हावं लागणार आहे.Rohit Shetty च्या घरावर गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; गेल्या दोन महिन्यांपूर्वीच रचलेला कट, रेकी झालेली अन्...राजपाल यादव हा आपल्या विनोदी अभिनयासाठी ओळखला जातो, मात्र या कायदेशीर कचाट्यामुळे त्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

दिल्ली उच्च न्यायालयाने राजपाल यादवला चेक बाऊन्स प्रकरणात तुरुंग अधीक्षकांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. | Achira News