Achira News Logo
Achira News

देवखेलः कोकणातील गावातील खुनाच्या रहस्यांचा शोध घेणारी एक मनोरंजक वेब मालिका

Loksatta
देवखेलः कोकणातील गावातील खुनाच्या रहस्यांचा शोध घेणारी एक मनोरंजक वेब मालिका
Full News
Share:

Tejashri Pradhan On Devkhel: प्राजक्ता माळी आणि अंकुश चौधरी यांच्या प्रमुख भूमिका असलेली देवखेळ ही वेब सीरिज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. ३० जानेवारी २०२६ पासून ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. चंद्रकांत गायकवाड दिग्दर्शित या वेब सीरिजचे कौतुक होताना दिसत आहे. ही गोष्ट कोकणातील गुहागरजवळच्या एका गावातील आहे. होळीदरम्यान होणारे खुनांचे गूढ यामध्ये पाहायला मिळते. १५ वर्षांपासून दर होळीला जो कोणी वाईट कर्म करत असेल, पाप करत असेल त्याचा बळी जातो. मात्र, हे सर्व शंकासुर करतो, पाप्याला शिक्षा देतो म्हणून देवतळीचे ग्रामस्थ हीच परंपरा असल्याचे समजतात. नव्यानेच बदली होऊन आलेल्या पोलिस अधिकारी विश्वासला याबद्दल माहीत होते. श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नाही या तत्त्वाने तो नेमके खून कोण करीत आहे, हे शोधण्याचा प्रयत्न करतो. त्याला अनेकांचा विरोध सहन करावा लागतो. भूतकाळाचा सामना करावा लागतो. त्यातून अनेक सत्ये उलगडतात. सात भागांची ही वेब सीरिज प्रेक्षकांची उत्सुकता वाढवते, पुढे नेमके काय होईल, याची प्रेक्षकांना आस लागते. या वेब सीरिजमध्ये अंकुश चौधरीने इन्स्पेक्टर विश्वास सरंजामे ही भूमिका साकारली आहे; तर अभिनेत्री प्राजक्ता माळीने सारिका निमकर ही भूमिका साकारली आहे. आता अभिनेत्री तेजश्री प्रधाननेदेखील ‘देवखेळ’चे कौतुक केले आहे. इन्स्टाग्रामवर तिने एक स्टोरी शेअर केली असून, या वेब सीरिजबद्दल तिने तिचे मत व्यक्त केले आहे. तेजश्रीने लिहिले की, हा मास्टरपीस आहे. सिनोमॅटोग्राफरच्या चष्म्यातून पाहिले, तर वेब सीरिजचे दिग्दर्शन उत्तम झाले असल्याचे जाणवते. लिखाणासहित परफॉर्मन्सेसही उत्तम आहेत. विनायक जाधव यांना टॅग करत तिने लिहिले की, लायटिंग आणि फ्रेम्स खूप छान आहेत. मला तुझा अभिमान आहे. ‘देवखेळ’चे दिग्दर्शक चंद्रकांत गायकवाड यांना टॅग करीत तिने लिहिले की, मी तुमची प्रोसेस पाहिली आहे. तुम्ही आणि तुमच्या टीमने खूप छान काम केले आहे. पुढे तिने वीणा जामकर आणि प्राजक्ता माळीच्या कामाचेदेखील कौतुक केले आहे. अंकुश चौधरीला टॅग करीत तिने लिहिले की, तू माझा कायमच आवडता कलाकार आहेस. तू तुझ्या भूमिकेला न्याय दिला आहेस. तेजश्रीने वेब सीरिजमधील प्रत्येक कलाकार आणि टेक्निशियनने उत्तम काम केले असल्याचे म्हणत त्यांचे कौतुक केले. त्याबरोबरच पार्श्वसंगीतही उत्तम असल्याचे अभिनेत्रीने लिहिले. तेजश्रीने असेही लिहिले, “या शंकासुराला पाहणं चुकवू नका; नाय तर त्यो सोडणार न्हाय.” दरम्यान, झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या या वेब सीरिजमध्येप्राजक्ता माळीआणि अंकुश चौधरी यांच्याबरोबरच वीण जामकर, ओंकार भोजने, अरुण नलावडे, मंगेश देसाई हे आणि इतर कलाकार दिसत आहेत. या वेब सीरिजला आयएमडीबीने ८.६ रेटिंग दिले आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Loksatta

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

देवखेलः कोकणातील गावातील खुनाच्या रहस्यांचा शोध घेणारी एक मनोरंजक वेब मालिका | Achira News