Ankush Choudhary on Prajakta Mali: विविध विषयांवरील, विविध जॉनरच्या वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. अनेकविध भाषा आणि देशांतील कंटेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतो. मराठीतही अनेक वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचे पाहायला मिळत आहे. या वेब सीरिजना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते. अंकुश चौधरीने देवखेळ या वेब सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण केले आहे. याआधी अंकुश चौधरीने अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. तसेच त्याने दिग्दर्शक, निर्माता म्हणूनही काम केले आहे. ३० जानेवारी २०२६ ला प्रदर्शित झालेल्या या वेब सीरिजमध्ये अंकुश चौधरीने विश्वास सरंजामे ही पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. या वेब सीरिजमध्ये प्राजक्ता माळीने सारिका निमकर ही भूमिका साकारली आहे. नुकतीचप्राजक्ता माळीआणि अंकुश चौधरीने तारांगणला मुलाखत दिली. या मुलाखतीत अंकुश चौधरीने प्राजक्ताच्या कामाचे कौतुक केले. तिच्या कामाच्या पद्धतीबद्दल, तसेच तिच्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील तिच्या सूत्रसंचालनाबाबत त्याने वक्तव्य केले. अंकुश चौधरी प्राजक्ता माळीबद्दल म्हणाला, “खूप चांगली, गुणी अभिनेत्री आहे. मला तिच्या दोन गोष्टी कायम आवडतात. जेव्हा ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये सूत्रसंचालक म्हणून काम करते. तेव्हा तेव्हा तिच्यासमोर मॉनिटर किंवा टेली प्रॉम्प्टर नसतो. ज्यामध्ये ती बघून बोलेल. मला ते जमू शकत नाही. प्राजक्ता जेव्हा बोलायला सुरू करते तेव्हा तिचा शब्दसंग्रह असतो. एका श्वासात ती सगळ्यांची नाव घेते सगळ्या स्पॉन्सर्सची नावे घेते. ती करेक्ट अँकरिंग करते” अंकुश चौधरी पुढे म्हणाला, “दुसरी गोष्ट अशी की आम्ही याआधी एका चित्रपटात एकत्र काम केले आणि आता देवखेळमध्ये एकत्र काम केले आहे. या दोन वर्षांमध्ये तिने निर्माती, अभिनेत्री म्हणून सगळ्या बाजू बघितल्या आहेत. त्यानंतर तिच्यामध्ये झालेला बदल कौतुकास्पद आहे.” देवखेळ या वेब सीरिजमधील तिच्या कामाबद्दल तो म्हणाला, “देवखेळमध्ये प्राजक्ताने खूप चांगलं काम केलं आहे”, असे म्हणत अंकुश चौधरीने प्राजक्ताच्या कामाचे कौतुक केले. देवखेळ या वेब सीरिजबद्दल बोलायचे तर ही वेब सीरिज झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. चंद्रकांत गायकवाड यांनी ही वेब सीरिज दिग्दर्शित केली आहे. सध्या या वेब सीरिजचे कौतुक होताना दिसत आहे. दरम्यान, प्राजक्ता माळी आणि अंकुश चौधरी यांच्याबरोबरच वीणा जामकर आणि इतर कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. आता आगामी काळात या वेब सीरिजला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
देवखेल वेब सीरिजद्वारे अंकुश चौधरीचे ओटीटी पदार्पण
Loksatta•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Loksatta
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.