कल्याण: बदलापूरहून दादरकडे जाणाऱ्या एसीलोकलट्रेनच्या टपावर चढून एका तरुणाने थरारक प्रवास केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली होती. यामुळे रेल्वे वाहतुकीवरही काही काळ परिणाम झाला. दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास विठ्ठलवाडी तेकल्याणदरम्यान एसीलोकलच्याछतावर एक तरुण चढल्याचे आढळून आले. या तरुणाची मानसिक स्थिती ठिक नसल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे डब्यातील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. विठ्ठलवाडी स्थानकावर रेल्वे पोलिसांनी त्या तरुणाला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो गाडीच्या टपावरुन खाली येण्यास तयार नव्हता. त्यामुळे परिस्थिती लक्षात घेता संबंधित लोकल पुढे कल्याण स्थानकाकडे रवाना करण्यात आली. कल्याण रेल्वे स्थानकावर ट्रेन पोहोचताच रेल्वे पोलीस आणि कर्मचाऱ्यांसह हमालांच्या मदतीने त्या तरुणाला खाली उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. अखेर सुमारे ३ वाजता मोठ्या प्रयत्नांनंतर त्याला सुरक्षितपणे खाली उतरवण्यात यश आले. त्यानंतर संबंधित तरुणाला तात्काळ रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. काही दिवसापूर्वी एका तरुणाने मद्यधुंद अवस्थेत रेल्वेच्या ओव्हरहेड वायर पोलवर चढल्याची घटना घडली होती. तेव्हा देखील रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. आज पुन्हा एक तरुण एसी ट्रेनच्या टपावर चढून प्रवास करीत असल्याची घटना घडल्याने रेल्वे प्रशासनाची सुरक्षा व्यवस्था फोल ठरली आहे.
धाडसी तरुणाच्या ट्रेनच्या वरच्या चढण्याने मुंबईत घबराट
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.