>>कोमल खांबे ये नया हिंदुस्तान है, अंदर घुसेगा भी और मारेगा भी... या डायलॉगप्रमाणे फुल ॲक्शन पॅक आणि देशभक्तीपर सिनेमा हा नक्कीच आहे. पण 'धुरंधर'ने निर्माण केलेल्या अपेक्षा हा सिनेमा पूर्ण करतो का? फूल एंटरटेनमेंट असूनही सिनेमा नक्की कुठे कमी पडतो? हे जाणून घेण्यासाठी आणि 'धुरंधर २' थिएटरमध्ये जाऊन बघण्याआधी हा रिव्ह्यू एकदा वाचा. कथानक:सिनेमाची सुरुवातच जस सिंग रागीच्या कुटुंबापासून होते. २१ वर्षांचा जसकिरत भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी तयारी करत असतो. मात्र त्याचा आयुष्यात अशी काही गोष्ट घडते. ज्यामुळे त्याचं आयुष्य ३६० डिग्रीचा टर्न घेतं. आणि इथेच सुरू होतो जसकिरतचा हमजा अली मजारी होण्याचा प्रवास. भारतीय गुप्तहेर बनून पाकिस्तान राहून तिथल्या गँगस्टरचा भाग होण्याच्या हमजाची गोष्ट आपण 'धुरंधर'मध्ये पाहिली. आता 'धुरंधर २'मध्ये हमजा अली पाकिस्तानात कसा जातो, रहमान डकैतच्या मृत्यूनंतर ल्यारीमध्ये स्वतःचे राज्य कस निर्माण करतो हे दाखवण्यात आलं आहे. मध्यंतरानंतर अनेक ट्विस्ट सिनेमात पाहायला मिळतात. बडे साहेब कोण? या सगळ्यात मोठा ट्विस्ट चाही उलगडा झालेला दिसतो. जो एकप्रकारे प्रेक्षकांसाठी अनपेक्षित धक्काच आहे. सिनेमात नोटबंदी, सर्जिकल स्ट्राइक यांसारख्या अनेक घटनांचे संदर्भ दिले गेले आहेत. त्यामुळे हा सिनेमा प्रपोगंडा वाटू शकतो. धुरंधरच्या पहिल्या भागापेक्षा डबल धमाका, ॲक्शन, ड्रामा असूनही हा सिनेमा प्रेक्षकांच्या अपेक्षेस खरा उतरण्यात कमी पडतो. मध्यंतरापर्यंत कथानक थोडं हळू पुढे सरकत असल्याने सिनेमा कंटाळवाणा वाटतो. मात्र त्यानंतर वेगाने घडामोडी घडतात. हमजा ज्या इंटरेस्टिंग पद्धतीने रिव्हेंज घेतो ते पाहिल्यानंतर थिएटरमध्ये टाळ्या पडतात. पण अनेक ठिकाणी अपेक्षित गोष्टी घडत असल्याने 'धुरंधर २' आधीच्या भागाप्रमाणे म्हणावा तितका सस्पेन्स तयार करण्यात फोल ठरल्याचं दिसतं. हमजाचं पुढे काय होतं? आपला बदला पूर्ण करण्यात तो यशस्वी होतो का? हे जाणून घेण्यासाठी सिनेमा पहावा लागेल.रणवीर सिंगच्याचाहत्यांना हा सिनेमा नक्कीच आवडेल. मात्र धुरंधरमुळे वाढलेल्या अपेक्षा 'धुरंधर २'ला पूर्ण करता आलेल्या नाहीत. दिग्दर्शन:सिनेमाची कथा आणि ट्विस्ट यामध्ये खिळवून ठेवण्यात दिग्दर्शकाला यश आलं आहे. ॲक्शन सीन्स अतिशय चांगल्या प्रकारे पडद्यावर उतरवण्यात आले आहेत, यात शंकाच नाही. बिग बजेट सिनेमा असल्याने सेट, vfx भव्य पद्धतीने साकारण्यात आले आहेत. ते सिनेमा पाहताना जाणवतं. आदित्य धरने त्याच्या परीने कथेला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. जसकिरत सिंह रांगीचा हमजा बनण्याचा प्रवास, त्याचा बदला अत्यंत ट्विस्ट अँड टर्न पद्धतीने त्याने पडद्यावर उतरवला आहे. सिनेमातील ॲक्शन सीन्स, म्युझिक जबरदस्त आहे. पण ४ तासांच्या सिनेमात २०००-२०१९ इतका मोठा काळ आणि त्यातील घटना पडद्यावर उतरवण्यात दिग्दर्शकाची काही ठिकाणी दमछाक झाल्याचं दिसून येतं. अभिनय:'धुरंधर'मध्ये दिसलेले बहुतांश कलाकार या दुसऱ्या भागातही आहेत. तर अनेक नवे चेहरे या सिनेमात दिसतात.रणवीर सिंगनेजसकिरत/ हमजाची भूमिका उत्तम पद्धतीने साकारली आहे. ॲक्शन सीन्स मध्ये तो भाव खाऊन गेला आहे. तर आर माधवन, सारा अर्जुन,संजय दत्तयांनीही त्यांच्या भूमिकांना न्याय दिला आहे. अभिनेत्री यामी गौतमचा स्पेशल अपिरन्स सिनेमात पाहायला मिळतो. अर्जुन रामपालने साकारलेली मेजर इकबालची भूमिका सिनेमाला टर्निंग पॉइंट देते. सकारात्मक बाजू:ॲक्शन सीन्स, VFX यासाठी हा सिनेमा एकदा तरी थिएटरमध्ये पाहायला हवा. नकारात्मक बाजू:पहिल्या भागानंतर सिनेमाची जेवढी क्रेझ निर्माण झाली होती तेवढा दुसरा भाग मनोरंजन करण्यात अपयशी ठरल्याचं दिसतं. थोडक्यात काय:रणवीर सिंगचे फॅन असाल आणि ॲक्शन पॅक देशभक्तीपर सिनेमे आवडत असतील तर 'धुरंधर २'देखील तुम्हाला आवडू शकतो. html, body, body:not(.web_whatsapp_com) *, html body:not(.web_whatsapp_com) *, html body.ds *, html body:not(.web_whatsapp_com) div *, html body:not(.web_whatsapp_com) span *, html body p *, html body h1 *, html body h2 *, html body h3 *, html body h4 *, html body h5 *, html body:not(.web_whatsapp_com) *:not(input):not(textarea):not([contenteditable=""]):not( [contenteditable="true"] ), html body:not(.web_whatsapp_com) *[class]:not(input):not(textarea):not([contenteditable=""]):not( [contenteditable="true"] ), html body:not(.web_whatsapp_com) *[id]:not(input):not(textarea):not([contenteditable=""]):not( [contenteditable="true"] ) { user-select: text !important; } html body *:not(input):not(textarea)::selection, body *:not(input):not(textarea)::selection, html body div *:not(input):not(textarea)::selection, html body span *:not(input):not(textarea)::selection, html body p *:not(input):not(textarea)::selection, html body h1 *:not(input):not(textarea)::selection, html body h2 *:not(input):not(textarea)::selection, html body h3 *:not(input):not(textarea)::selection, html body h4 *:not(input):not(textarea)::selection, html body h5 *:not(input):not(textarea)::selection { background-color: #3297fd !important; color: #ffffff !important; } /* linkedin */ /* squize */ .www_linkedin_com .sa-assessment-flow__card.sa-assessment-quiz .sa-assessment-quiz__scroll-content .sa-assessment-quiz__response .sa-question-multichoice__item.sa-question-basic-multichoice__item .sa-question-multichoice__input.sa-question-basic-multichoice__input.ember-checkbox.ember-view { width: 40px; } /*linkedin*/ /*instagram*/ /*wall*/ .www_instagram_com ._aagw { display: none; } /*developer.box.com*/ .bp-doc .pdfViewer .page:not(.bp-is-invisible):before { } /*telegram*/ .web_telegram_org .emoji-animation-container { display: none; } html body.web_telegram_org .bubbles-group > .bubbles-group-avatar-container:not(input):not(textarea):not( [contenteditable=""] ):not([contenteditable="true"]), html body.web_telegram_org .custom-emoji-renderer:not(input):not(textarea):not([contenteditable=""]):not( [contenteditable="true"] ) { pointer-events: none !important; } /*ladno_ru*/ .ladno_ru [style*="position: absolute; left: 0; right: 0; top: 0; bottom: 0;"] { display: none !important; } /*mycomfyshoes.fr */ .mycomfyshoes_fr #fader.fade-out { display: none !important; } /*www_mindmeister_com*/ .www_mindmeister_com .kr-view { z-index: -1 !important; } /*www_newvision_co_ug*/ .www_newvision_co_ug .v-snack:not(.v-snack--absolute) { z-index: -1 !important; } /*derstarih_com*/ .derstarih_com .bs-sks { z-index: -1; } html body .alc_unlock-pseudo-before.alc_unlock-pseudo-before.alc_unlock-pseudo-before::before { pointer-events: none !important; } html body .alc_unlock-pseudo-after.alc_unlock-pseudo-after.alc_unlock-pseudo-after::after { pointer-events: none !important; }
'धुरंधर 2'चा रिव्ह्यूः हमजा अली मजारीचा'स्पाय'पासून'गँगस्टर'पर्यंतचा अॅक्शन-पॅक केलेला प्रवास
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.