Achira News Logo
Achira News

'धुरंधर 2'दक्षिण भारतात छाप पाडण्यात अपयशी ठरला कारण उस्ताद भगत सिंगने मध्यवर्ती भूमिका घेतली

Lokmat
'धुरंधर 2'दक्षिण भारतात छाप पाडण्यात अपयशी ठरला कारण उस्ताद भगत सिंगने मध्यवर्ती भूमिका घेतली
Full News
Share:

South Cinema:सध्या इंडियन बॉक्स ऑफिसवर आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर २ ने बॉक्स ऑफिसवर अक्षरश धुमाकूळ घातला आहे. पहिल्या भागाच्या यशानंतर आता या सीक्वलकडून प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा आहेत. आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर २' हासिनेमाकाल १९ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा गाठलाय. रणवीरचा हासिनेमावेगवेगळ्या भाषांमध्ये रिलीज करण्यात आला आहे. मात्र, एकीकडे धुरंधर २ सिनेमाची देशभरात चर्चा सुरू असताना साऊथमध्ये 'उस्ताद भगत सिंग 'सिनेमानं बॉक्स ऑफिसवर बाजी मारली आहे. 'धुरंधर २' ने केवळ पेड प्रिव्ह्यूमधूनच ४३ कोटी रुपयांची कमाई केली. भारतातील पहिल्या दिवसाचे निव्वळ कलेक्शन १०२ कोटी रुपयांपेक्षा जास्त होते. परंतु,साऊथमध्ये या चित्रपटाला प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणण्यास फारसं यश मिळालेलं दिसत नाही. याचं कारण म्हणजे यावेळी दाक्षिणात्य सिनेसृष्टीत सुपरस्टारपवन कल्याणच्या'उस्ताद भगत सिंग' क्रेझ पाहायला मिळतेय. दक्षिण भारतात विशेषतः 'सिंगल स्क्रीन'वर 'उस्ताद भगत सिंग' चित्रपटाने दबदबा निर्माण केला आहे. धुरंधर २ च्या वादळातही हा सिनेमा ताठ मानेने उभा आहे.हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर २' ला टक्कर देताना दिसतोय. सॅकनिल्कचा रिपोर्टनुसार,पवन कल्याणच्या'उस्ताद भगत सिंग' या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ३१.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. तरधुरंधर सिनेमानेसाऊथमध्ये ६० लाख इतकी कमाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हैदराबादमध्ये'उस्ताद भगत सिंग' सिनेमाचे ७५४शोज सुरु आहेत. तर धुरंधर २ ला केवळ ८४ स्क्रिन्स मिळाल्यात. ज्याचा चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होतोय. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांमध्ये 'उस्ताद भगत सिंग' या टॉलिवूड अॅक्शन थ्रिलर चित्रपटाची बरीच चर्चा होती. अखेरीस बऱ्याच प्रतीक्षेनंतर हा सिनेमा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. रिलीजपूर्वीच 'उस्ताद भगत सिंग'या चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये तब्बल २० कोटींचा टप्पा ओलांडला होता. पण, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये पवन कल्याणची क्रेझ पाहता, तिथे चित्रपटाने ५० ते ६० कोटींची कमाई केल्याची माहिती मिळते आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

'धुरंधर 2'दक्षिण भारतात छाप पाडण्यात अपयशी ठरला कारण उस्ताद भगत सिंगने मध्यवर्ती भूमिका घेतली | Achira News