दिग्दर्शक आदित्य धरचा 'धुरंधर: द रिव्हेंज' (Dhurandhar: The Revenge) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर सुसाट सुटला आहे.रणवीर सिंगआणिसारा अर्जुनयांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १०२.५५ कोटींची ऐतिहासिक कमाई करत नवा विक्रम प्रस्थापित केला. या यश साजरं करण्यासाठी आयोजित केलेल्या 'सक्सेस पार्टी'मधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 'धुरंधर: द रिव्हेंज'ला प्रेक्षकांकडून मिळत असलेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतररणवीर सिंग, आदित्य धर, यामी गौतम आणि संपूर्ण टीमने एका शानदार पार्टीचे आयोजन केले होते. याच पार्टीत 'उल्फत हुसेन'ची भूमिका साकारणाऱ्या सौम्या टंडनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सौम्या टंडन गमतीने रणवीर सिंग आणि पार्टीत उपस्थित असलेल्या इतर लोकांना कानशिलात मारण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. वास्तविक, 'धुरंधर'च्या पहिल्या भागात सौम्याने अक्षय खन्नाला (रहमान डकैत) कानाखाली मारली होती. तर दुसऱ्या भागात तिने रणवीर सिंगच्या (हमजा अली मजारी) कानशिलात लगावल्याचे दृश्य आहे. सेटवर सौम्याच्या या 'कानशिलात' मारण्याच्या स्टाईलमुळे रणवीरने तिला गमतीने "स्लॅपिंग क्वीन" असा टॅग दिला आहे. सौम्या टंडनने तिच्या इंस्टाग्रामवर या पार्टीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. यामध्ये रणवीर सिंग 'FA9LA' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या पार्टीला कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा आणि अभिनेत्रीसारा अर्जुनयांनीही हजेरी लावली होती.
'धुरंधरः द रिव्हेंज पार्टी'मध्ये अभिनेत्री सौम्या टंडन रणवीर सिंगला मारण्याचा प्रयत्न करतानाचा व्हिडिओ व्हायरल
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.