Achira News Logo
Achira News

'धुरंधरः द रिव्हेंज "या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाने पहिल्या दिवसाच्या प्रभावी कमाईसह तिकीटबारीवर विजय मिळवला

Maharashtra Times
'धुरंधरः द रिव्हेंज "या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाने पहिल्या दिवसाच्या प्रभावी कमाईसह तिकीटबारीवर विजय मिळवला
Full News
Share:

मुंबई -डिसेंबर २०२५ मध्ये 'धुरंधर' या स्पाय ॲक्शन थ्रिलर चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर, आदित्य धर दिग्दर्शित ' धुरंधर: द रिव्हेंज ' आज प्रदर्शित झाला आहे. या वर्षातील बहुप्रतिक्षित सिनेमानं, १८ मार्च रोजी झालेल्या पेड प्रिव्ह्यू शोमधून प्रचंड कमाई केली. आता, १९ मार्च रोजी, हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. जाणून घेऊया या सिनेमानं पहिल्याच दिवशी किती कमाई केली?Dhurandhar 2 Spoiler Alert : प्रेक्षकांचा अंदाज खरा ठरला! 'बडे साहब' म्हणजे दाऊद; सिनेमात अंडरवर्ल्ड डॉनची भूमिका साकारणारा अभिनेता कोण?'धुरंधर: द रिव्हेंज'ने पेड प्रिव्ह्यू शोमधून किती कमाई केली?बुधवारी संध्याकाळी'धुरंधर: द रिव्हेंज'या सिनेमाच्या प्रीमियर शोदरम्यान या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली. या चित्रपटाने प्रिव्ह्यू शोमधून भरघोस कमाई केली आहे. SACNILC च्या आकडेवारीनुसार, आदित्य धर दिग्दर्शित चित्रपटाने देशभरातील १२,२९२ पेड प्रिव्ह्यू शोमधून ५२.७१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने पेड प्रीमियर शोमधून ४३.०० कोटी रुपये कमावले आहेत. जगभरात, केवळ पेड प्रिव्ह्यू शोमधूनच ७५ कोटी रुपयांची कमाई झाली.रणवीर सिंगची बॉसी एंट्री, अन् चाहत्यांनी केलं असं काही...धुरंधर २ पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन'धुरंधर द रिव्हेंज', याचित्रपटानंपेड प्रिव्ह्यूमधून ४३ कोटी रुपये कमावले. पेड प्रिव्ह्यूमध्ये चित्रपटाला ४६.७ टक्के प्रेक्षक उपस्थिती मिळाली. पहिल्या दिवशी संध्याकाळी ६:३० वाजेपर्यंत सिनेमानं ७१.०८ कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन ११४.०८ कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. रात्रीपर्यंत हे आकडे वाढण्याची अपेक्षा आहे.16 वर्षांनी लहान Mumtaz यांच्या प्रेमात होते शम्मी कपूर, लग्नाची मागणीही घातलेली; पण एका अटीमुळे निर्माण झाली दोघांमध्ये दरी'धुरंधर २' २०० कोटींची ओपनिंग गाठू शकतो!धुरंधर २ ने प्रिव्ह्यू शोमध्ये आधीच धुमाकूळ घातला आहे. मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता, हा चित्रपट जगभरात पहिल्याच दिवशी २०० कोटींचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. भारतातही हा चित्रपट १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करून ओपनिंग करेल अशी अपेक्षा आहे.Revati Lele : सहा वर्षांपूर्वी अभिनेत्रीला टीव्हीवर पाहिलं, पहिल्याच भेटीत प्रेमात; नशिबानं जुळवली रेवती-कौशिकची साता जन्माची गाठदरम्यान, 'धुरंधर' हा एक सर्वकालीनब्लॉकबस्टरहिट चित्रपट होता. या सिनेमानं १३ अब्ज रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती. आता या सिनेमाचा सिक्वलही यश मिळवताना दिसत आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

'धुरंधरः द रिव्हेंज "या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाने पहिल्या दिवसाच्या प्रभावी कमाईसह तिकीटबारीवर विजय मिळवला | Achira News