Dhurandhar 2 The Revenge Teaser:ज्याची सर्वांना कालपासून उत्सुकता होती त्या 'धुरंधर पार्ट २ - द रिव्हेंज' सिनेमाचा टीझर भेटीला आला आहे. या सिनेमाच्या टीझरची काल दिग्दर्शक आदित्य धरने घोषणा केली होती. १२ - १२ असा आकडा त्याने टाकला होता. अखेर आज बरोबर १२ च्या ठोक्याला 'धुरंधर पार्ट २'चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. १ मिनिटं १२ सेकंदचा हा टीझर जबरदस्त असून दिग्दर्शकाने सिनेमाची रिलीज डेटही जाहीर केली आहे.'धुरंधर पार्ट २' चा अंगावर काटा आणणारा टीझरआदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर पार्ट २'चा जबरदस्त टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये हमजा अली मजारी अर्थातरणवीर सिंगचंपूर्वायुष्य दिसणार आहे. शांत, साध्या स्वभावाचा हमजा 'धुरंधर' कसा झाला, याचा प्रवास 'धुरंधर पार्ट २'मध्ये दिसणार आहे.रणवीर सिंगच्याअभिनयाची ताकद टीझरमध्ये पाहायला मिळतेय. टीझरच्या शेवटी एक संवाद दिसतोय. जो सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. ''ये नया हिंदुस्तान है, ये घरमें घुसेगा भी और मारेगा भी''. या टीझरमध्ये एक खास गोष्ट बघायला मिळतेय. पहिल्या भागातअक्षय खन्ना'शेर ए बलुच' झाला होता आणि त्याने केलेला डान्स चांगलाच गाजला होता. आता दुसऱ्या भागात रणवीर सिंग 'शेर ए बलुच'च्या गादीवर बसलेला दिसतोय. याशिवाय पुन्हा एकदा Fa9la गाण्याची झलक दिसतेय. 'धुरंधर पार्ट २'मध्येही रक्तरंजित थरार बघायला मिळणार आहे.'धुरंधर पार्ट २' सिनेमा कधी रिलीज होणार, याकडे सर्वांचं लक्ष होतं. टीझरच्या शेवटी याचाही खुलासा होत आहे. १९ मार्च २०२६ ला 'धुरंधर पार्ट २' रिलीज होणार आहे. पुन्हा एकदा रणवीर सिंगसह, अर्जुन रामपाल, संजय दत्त, सारा अर्जुन,आर.माधवनया कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. 'धुरंधर'चा पहिला भाग गाजवणाराअक्षय खन्नाया दुसऱ्या भागात दिसणार की नाही, याची सर्वांना उत्सुकता आहे.
धुरंधर भाग 2-द रिव्हेंज टीझर रिलीजः हमजा अली मजारीच्या परिवर्तनाची एक झलक
Lokmat•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.