Achira News Logo
Achira News

'नेक्स्ट फ्रायडे सेव्हन ओ'क्लॉक'या नव्या नाटकासह सतीश राजवाडेचे पुनरागमन

Maharashtra Times
'नेक्स्ट फ्रायडे सेव्हन ओ'क्लॉक'या नव्या नाटकासह सतीश राजवाडेचे पुनरागमन
Full News
Share:

स्टार प्रवाह वाहिनीची जबाबदारी, चित्रपटाचा व्याप सांभाळत सतीश राजवाडे पुन्हा रंगभूमीवर पुनरागमन करत आहे, त्यामुळे सतीशबद्दल 'तो सध्या नाटक करतोय', असंच म्हणावं लागेल. त्यानं आपल्या नव्या नाटकाची माहिती पहिल्यांदा 'मुंटा'शीच शेअर केली आहे.'पुढच्या शुक्रवारी सात वाजता'हे सतीशच्या नव्या नाटकाचं नाव आहे. या नाटकाचं लेखन सुदीप मोडक, दिग्दर्शन नीरज शिरवईकर तर निर्मिती अजित भुरे यांनी केली आहे. नाटकात सतीश राजवाडे, चैत्राली गुप्ते, सुदीप मोडक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नव्या नाटकाच्या निमित्तानं 'मुंटा'नं त्याच्याशी खास संवाद साधला. 'आजच्या धावपळीच्या, संघर्षाच्या काळात प्रत्येकाला आशा देणारं हे नाटक आहे. प्रेक्षक नाटक पाहून घरी जाताना उमेद घेऊन जातील, याची खात्री आहे. आपल्या भवतालचं प्रतिबिंब नाटकात पडल्याचं प्रेक्षकांना जाणवेल. या नाटकात 'अ परफेक्ट मर्डर'हून वेगळ्या भूमिकेत प्रेक्षक मला पाहतील', असं सतीशनं सांगितलं. वाहिनीचं काम, चित्रपटाच्या कामाचा व्याप सांभाळत सतीश सध्या नाटकाच्या तालमीचा आनंद घेतोय. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात ' पुढच्या शुक्रवारी सात वाजता ' हे नाटक रंगभूमीवर येणार असल्याचं कळतंय.बिग बॉस मराठी ६चं नवं घर प्रेक्षकांसमोर अखेर आलंचसतीशनं रंगभूमीशी असलेल्या त्याच्या नात्याविषयी सांगितलं, 'कॉलेजमध्ये असताना मी ७०हून अधिक एकांकिका केल्या. एकांकिकांमुळेच मला पुढची कामं मिळत गेली. रंगभूमी कलाकाराला अनेक गोष्टी शिकवते. रंगभूमीमुळे कलाकाराच्या आयुष्याला शिस्त लागते. रंगभूमी तुमच्यात सांधिकता, सहकार्याची भावना निर्माण करते. त्यामुळे रंगभूमीनं दिलेली अनुभवांची शिदोरी तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल, तरी तुम्हाला फायद्याची ठरते.'Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरात आले दोन नवीन पाहुणे, स्पर्धकांची बसली दातखिळी; टास्कमध्ये काढली एकमेकांची उणीधुणीमी १९ वर्षांनी मध्यंतरी 'अ परफेक्ट मर्डर' नाटक केलं होतं. त्यानंतर माझ्याकडे अनेक संहिता आल्या. पण मला मनासारखं नाटक मिळत नव्हतं. 'पुढच्या शुक्रवारी सात वाजता'ची संहिता माझ्याकडे नितीन नाईक, नीरज शिरवईकर, सुदीप मोडक घेऊन आले. मला नाटकाची संहिता फार आवडली. त्यामुळे हे नाटक करण्याचा मी निर्णय घेतला.-सतीश राजवाडे

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

'नेक्स्ट फ्रायडे सेव्हन ओ'क्लॉक'या नव्या नाटकासह सतीश राजवाडेचे पुनरागमन | Achira News