लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर:इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीच्या द्वितीय वर्षाला शिकत असलेल्या विद्यार्थ्याने सोमवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास वसतिगृहाच्या नवव्या माळ्यावरून उडी घेत आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. दरम्यान, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचा मोबाइल 'अनलॉक' झाल्यानंतर त्याच्या आत्महत्येचे खरे कारण समजू शकणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. श्रेयस चंद्रकांत माने (२१) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो मूळचा कोल्हापूर येथील रहिवासी असून तो नागपुरातील बुटीबोरी परिसरातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीच्या द्वितीय वर्षाला शिकत होता. मंगळवारी श्रेयसची सेमिस्टर परीक्षा सुरू होणार होती. तो वसतिगृहात राहत होता. त्याच्या खोलीत एकूण ४विद्यार्थीराहत होते. परंतु, श्रेयस मागील काही दिवसांपासून खोलीतील मित्रांशीदेखील काही बोलत नव्हता. अभ्यास झाला नसल्यामुळे तो तणावात होता, अशी माहिती त्याच्या खोलीतील विद्यार्थ्यांनी पोलिसांना दिल्याची माहिती आहे. सोमवारी पहाटे ४ वाजेनंतर तो खोलीच्या बाहेर निघाला. त्यानंतर तो लिफ्टने नवव्या माळ्यावर गेला. तेथून त्याने उडी मोबाइल अनलॉक झाल्यानंतर कळेल कारण घेतली. यात जखमी झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, ही घटना उघडकीस आल्यानंतर महाविद्यालय प्रशासनाने बुटीबोरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. बुटीबोरी पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी श्वानपथक, ठसेतज्ज्ञ व न्याय वैद्यक विभागाला पाचारण केले. श्रेयसने चौथ्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. परंतु, त्याने नेमक्या कोणत्या कारणावरून आत्महत्या केली, हे मात्र अद्यापही स्पष्ट होऊ शकले नाही. याबाबतनागपूरग्रामीणचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक अनिल म्हस्के यांना विचारणा केली असता श्रेयसचा मोबाइल अनलॉक झाल्यानंतर आत्महत्येचे कारण समजू शकणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नागपूरच्या भारतीय माहिती आणि तंत्रज्ञान संस्थेत विद्यार्थ्याची आत्महत्या
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.