Achira News Logo
Achira News

नागपूरच्या सावनेरमध्ये तीन अल्पवयीन मुलांनी 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार केलाः पोलिसात गुन्हा दाखल

Lokmat
नागपूरच्या सावनेरमध्ये तीन अल्पवयीन मुलांनी 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार केलाः पोलिसात गुन्हा दाखल
Full News
Share:

सावनेर (नागपूर) :नात्याला काळिमा फासणारी आणि माणुसकीला लाजवणारी एक घृणास्पद घटना सावनेर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सरोदी टोला (तेलगाव कामठी) येथे उघडकीस आली आहे. अवघ्या १४ वर्षांच्या मुलीवर तिच्याच दूरच्या नातेवाईक असलेल्या तीन अल्पवयीन मुलांनी वारंवार अत्याचार केल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि तिन्ही आरोपी एकाच गावातील रहिवासी असून एकमेकांचे दूरचे नातेवाईक आहेत. या नराधमांनी केवळ अत्याचारच केला नाही, तर पीडितेचे अश्लील व्हिडिओ देखील बनवले. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला वारंवार ब्लॅकमेल करण्यात आले आणि तिचे शारीरिक शोषण करण्यात आले. पोलिसांची कारवाई आणि गुन्हे दाखल पीडितेने धीर धरून सावनेर पोलिसांत धाव घेतली, घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(२) (m), ६५(१), ७०(२), ३५१(४) आणि सह पोक्सो (POCSO) कायद्याच्या कलम ६६ (e) व ६७ (b) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीणनागपूरचेअतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सावनेरचे ठाणेदार उमेष पाटील पुढील तपास करत आहेत.आरोपींची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली. पोलिसांनी तिन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेऊन सावनेर न्यायालयात हजर केले. मात्र, आरोपी अल्पवयीन असल्याने न्यायालयाने त्यांना नागपूर येथील बालसुधारगृहात पाठवण्याचे आदेश दिले आहेत. कायद्याची कमकुवत बाजू की गुन्हेगारांचे फावले? ही घटना समाजातील एका भीषण वास्तवाकडे बोट दाखवते. १४ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करणारे आरोपी केवळ 'अल्पवयीन' आहेत म्हणून कडक शिक्षेपासून वाचणार का? वारंवार होणारे असे गुन्हे आणि त्यांना मिळणारी मवाळ वागणूक यामुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढत आहे. अशा क्रूर गुन्ह्यांसाठी कायद्यात कठोर बदलांची गरज असून, तरच अशा प्रवृत्तींना चाप बसेल. अन्यथा, रोज अशा बातम्या वाचण्याची दुर्दैवी वेळ समाजावर येईल.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

नागपूरच्या सावनेरमध्ये तीन अल्पवयीन मुलांनी 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार केलाः पोलिसात गुन्हा दाखल | Achira News