Achira News Logo
Achira News

नागपूरमधील लाकूड व्यापाऱ्यांच्या गोदामाला भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही

Lokmat
नागपूरमधील लाकूड व्यापाऱ्यांच्या गोदामाला भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही
Full News
Share:

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर:कळमना येथील चिखली ले-आऊट परिसरात मंगळवारी मध्यरात्री टिंबर ट्रेडर्सच्या (सॉ मील) गोदामाला भीषणआगलागली. या घटनेत मे. रामेश्वर टिंबर ट्रेडर्स आणि मे. कमला टिंबर ट्रेडर्सचे मोठे नुकसान झाले असून, सुमारे १ कोटी २५ लाख रुपयांची मालमत्ता जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज मनपाच्या अग्निशमन विभागाने वर्तवला आहे. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्लॉट क्रमांक ६२६, चिखली ले-आऊट येथील पुरुषोत्तम रामजी पटेल यांच्या मालकीचे मे. रामेश्वर टिंबर ट्रेडर्स आणि शंकरलाल पटेल यांच्या मालकीचे मे. कमला टिंबर ट्रेडर्स येथे मंगळवारी मध्यरात्री १.२० वाजताच्या सुमारासआगलागली. या आगीने पाहता पाहता रौद्र रूप धारण केले. या दुर्घटनेत सागवान लाकूड, दोन वुड कटिंग मशिन्स, संपूर्ण टीन शेड, इलेक्ट्रिक वायरिंग आणि एसी पूर्णपणे जळून खाक झाले. आगीची भीषणता ऐवढी होती की आगीतून कोणतीही मालमत्ता वाचवता आली नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने हालचाली सुरू केल्या. घटनास्थळी कळमना, सिव्हिल लाईन्स, सुगतनगर, सक्करदरा, वाठोडा, लकडगंज आणि कॉटन मार्केट या सात अग्निशमन केंद्रातून पाण्याचे बंब पाठवण्यात आले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रमानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. शॉर्ट सर्किट किंवा अन्य कारण असू शकते, असा संशय असून अग्निशमन विभाग आणि स्थानिक पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

नागपूरमधील लाकूड व्यापाऱ्यांच्या गोदामाला भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही | Achira News