Nagarjun Fintness Mantra : राष्ट्रीय पुरस्कारविजेते नागार्जुन त्यांच्या दमदार अभिनयासह फिटनेससाठीही ओळखले जातात. ‘मास’ चित्रपटातून घराघरात पोहोचलेले नागार्जुन ६५ वर्षांचे आहेत. पण, त्यांचा फिटनेस पाहून कोणीही त्यांना ४० हून अधिक वयाचं समजणार नाही. त्यामुळे अनेकांना त्यांच्या फिटनेस, डाएट प्लॅनबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. ‘ई टाइम्स’च्या वृत्तानुसार जेव्हा नागार्जुन यांना आजही ते इतके तरुण कसे दिसतात, असं विचारलं गेलं तेव्हा ते म्हणाले, “मला माहीत नाही. मी भूक मारत नाही आणि क्रॅश डाएटही करीत नाही.” यासह त्यांनी त्यांच्या फिटनेसबद्दलच्या काही गोष्टी शेअर केल्या होत्या. ‘एबीपी’च्या वृत्तानुसार नागार्जुन म्हणालेले, “मी ४५ वर्षांपासून एक्सरसाइज करणं कधीच थांबवलं नाही. तेव्हा जिमसुद्धा नव्हते; पण आरोग्यासाठी मी काटेकोरपणे एक्सरसाइज केली आहे. सर्वांत महत्त्वाचं हे आहे की, मी कायम पॉझिटिव्ह विचार करतो. मी काहीही झालं तरी कधीच निराश होत नाही.” ‘कुली’ चित्रपटात रजनीकांत व नागार्जुन एकत्र झळकले. उल्लेख केलेल्या माध्यमाच्या वृत्तानुसार या चित्रपटाच्या एका कार्यक्रमादरम्यान, रजनीकांत गमतीत नागार्जुन यांना म्हणालेले, “मी त्याच्यासह १९९१ मध्ये ‘शांती क्रांती’ चित्रपटात काम केलेलं. तो तेव्हापासून ते आजपर्यंत तितकाच तरुण आहे. माझे तर सगळे केस गेले’; पण त्यानं मात्र त्याच्या फिटनेसची पूर्ण काळजी घेतली आहे. मी जेव्हा त्याला हे त्यानं कसं केलं याबद्दल विचारलं तेव्हा त्यानं एक्सरसाइज आणि योग्य आहार हे उत्तर दिलं.” दरम्यान, नागार्जुन हे दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. त्यांनी अलीकडे ‘कुबेरा’, ‘कुली’, ‘ना सामी रंगा’ अशा अनेक चित्रपटांतून काम करत त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अभिनेते नेहमी कुठल्या न कुठल्या कारणामुळे चर्चेत असतात. नागार्जुन यांचा येत्या काळात १००वा चित्रपट प्रदर्शित होणार असून ते रा कार्तिक यांच्या आगामी चित्रपटातून झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे.
नागार्जुनचा तंदुरुस्ती मंत्रः वयहीन तारुण्यासाठी एक पाककृती
Loksatta•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Loksatta
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.