Achira News Logo
Achira News

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारताचे वर्चस्व, 2026 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी सूर्यकुमार यादव चमकला

Maharashtra Times
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारताचे वर्चस्व, 2026 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी सूर्यकुमार यादव चमकला
Full News
Share:

तिरुवनंतनमपुरम:भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका 4-1 अशी जिंकून 2026 च्या टी-20 विश्वचषकासाठी आपली तयारी पूर्णपणे मजबूत केली आहे. भारताचा टी-20 मध्ये दरारा कायम असल्याचे पुन्हा पाहायला मिळाले. या मालिकेत टीम इंडियाचे फलंदाजीचे वर्चस्व दिसून आले, सलामीवीर फलंदाज Abhishek Sharma आणि दीर्घ अनुपस्थितीनंतर भारतीय संघात परतलेला यष्टीरक्षक-फलंदाज Ishan Kishan त्याच्या कामगिरीने प्रभावित केले. या दोघांनी मालिका गाजवूनही त्यांना प्लेअर ऑफ द सिरीजतचा पुरस्कार मिळाला नाही तर कोणाला मिळाला ते पाहा...टीम इंडियाचा टी-20 कर्णधार Suryakumar Yadavफॉर्म 2025 मध्ये विशेषतः खराब होता, ज्यामुळे टीका झाली. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत, त्याची कामगिरी सर्वात लक्षवेधी होती, ज्याने आगामी टी-20 विश्वचषकापूर्वी सर्वांची मने जिंकली. या मालिकेत भारतीय संघासाठी सर्वात मोठी संधी म्हणजे कर्णधार सूर्यकुमार यादव चा फॉर्म, ज्याने तीन अर्धशतके झळकावली आणि प्लेअर ऑफ दि सिरीजचा पुरस्कार जिंकला. सूर्याने मालिकेतील पाचही सामन्यांमध्ये फलंदाजी केली आणि 80.67 च्या प्रभावी सरासरीने 242 धावा केल्या, ज्यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश होता. या काळात सूर्यकुमार यादवचा स्ट्राईक रेट 196.75 होता. त्याने मालिकेत 25 चौकार आणि 14 षटकारही मारले. 2026 च्या टी-20 विश्वचषकापूर्वी सूर्यकुमार यादव फॉर्ममध्ये परतल्याने, टीम इंडियाची फलंदाजी क्रमवारी पूर्वीपेक्षा जास्त धोकादायक दिसते.2026 च्या टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाली तेव्हा त्यात इशान किशनचे नाव समाविष्ट होते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर, इशानने टीम इंडियामध्ये पुनरागमन केले आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत त्याने निवडकर्त्यांचा निर्णय पूर्णपणे बरोबर असल्याचे सिद्ध केले. या मालिकेत इशानच्या बॅटमधून 53.75 च्या सरासरीने एकूण 215 धावा निघाल्या, ज्यामध्ये एक शतक आणि एक अर्धशतकी खेळी समाविष्ट होती.आता भारतीय संघ टी-20 विश्वचषक खेळणार आहे. या विश्वचषकाला सुरुवात 7 फेब्रुवारीपासून होईल. पहिला सामना भारत अमेरिकेविरुद्ध खेळेल. भारताचा पहिला सामना हा विश्वचषकाच्या पहिल्याच दिवशी असणार आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारताचे वर्चस्व, 2026 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी सूर्यकुमार यादव चमकला | Achira News