चोरी करणं हा गुन्हा आहे, हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. चोरी केल्यास कडक शिक्षा होते. पण हे माहित असूनही काही लोक चोऱ्या करताना दिसतात. अशाच काही चोरांचा व्हिडिओ समोर आला आहे. एक महिला आपल्या मुलीला शाळेत सोडत होती. त्यावेळी चोरट्यांच्या टोळीनं तिला घेरलं आणि तिचे दागिने, बॅग आणि मोबाईल फोन हिसकावून घेतले. ही घटना रस्त्यावरील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून आता हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.(फोटो सौजन्य - @gajabhauX/X.com)कशी झाली चोरी?हा व्हिडिओ @gajabhauX या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. कॅप्शननुसार ही घटना नवी दिल्लीमध्ये घडली आहे. व्हिडिओमध्ये दिसतं की, एक महिला आपल्या मुलीला शाळेच्या बसमध्ये बसवून घरी जात होती. त्याच वेळी चोरट्यांच्या टोळीनं तिला घेरलं. तिच्याकडील फोन, पैसे आणि दागिने हिसकावून घेतले आणि ते पळून गेले. लक्षवेधी बाब म्हणजे ही घटना भरदिवसा रस्त्यावर घडली.(फोटो सौजन्य - @gajabhauX/X.com)मदतीसाठी कोणीच पुढे आलं नाहीहा व्हिडिओ आतापर्यंत हजारो नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांनी तीव्र टीका केली आहे. दिल्ली पोलिसांनी चोरट्यांना शोधून त्यांना शिक्षा करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, आसपास उभी असलेली लोकं काय करत होती, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. कारण या महिलेच्या मदतीसाठी कोणीच पुढे आलं नाही.(महत्वाची टीप - या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)
नवी दिल्लीतील दिवसाच्या प्रकाशात चोरांनी आईचे दागिने, पिशवी आणि फोन चोरले
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.