Achira News Logo
Achira News

निवडणुकांमध्ये मानवतेचा उलगडाः कुटुंबाचे ट्रम्प यांच्या राजकारणाशी संबंध

Pudhari
निवडणुकांमध्ये मानवतेचा उलगडाः कुटुंबाचे ट्रम्प यांच्या राजकारणाशी संबंध
Full News
Share:

प्रचारात आता आपला माणूस एका मतासाठी सुरू असलेली धावपळ ही प्रचारापुरती मर्यादित न राहता, विसरलेली आपुलकी, तुटलेले संवाद आणि दुरावलेली नाती पुन्हा जोडणारी ठरत आहे.कित्येक वर्षांपासून न भेटलेले नातेवाईक या निमित्ताने पुन्हा घराच्या ओसरीवर येऊन बसत आहेत. कामानिमित्त परगावी गेलेले, शेतात राबणारे तसेच रोजीरोटीसाठी गावाबाहेर स्थायिक झालेले आप्तस्वकीयही गावाकडे परतत आहेत. राजकारणाची चर्चा नंतर होते; आधी तब्येतीची, शेती आणि लेकराबाळांची चौकशी होत आहे. ‌‘आपलाच माणूस‌’ हा शब्द कृतीतून दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे काही कुटुंबांत मतभेद असले, तरी नात्यांची दोरी पूर्णपणे तुटलेली नाही, हे निवडणुकीतून स्पष्ट होत आहे. मतदार आता उमेदवाराकडे नेता म्हणून नव्हे, तर अडचणीच्या काळात सोबत राहणारा माणूस म्हणून पाहू लागले आहेत. लढत सत्तेसाठीची न राहता संवेदनशीलतेची बनली असून माणुसकीची आठवण करून देणारीही ठरत आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

निवडणुकांमध्ये मानवतेचा उलगडाः कुटुंबाचे ट्रम्प यांच्या राजकारणाशी संबंध | Achira News