Achira News Logo
Achira News

नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम जाणून घेण्यासाठी बिहारच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी सातारा जिल्ह्याला भेट दिली

Sakal
नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम जाणून घेण्यासाठी बिहारच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी सातारा जिल्ह्याला भेट दिली
Full News
Share:

नागठाणे :सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची राबवणूक आता बिहार राज्यात होणार आहे. त्या अनुषंगाने बिहारच्या उच्चपदस्थ अधिकारी पथकाने शाळांना भेटी दिल्या.सध्या जिल्ह्यातील शाळांतून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी वाचन, लेखन, आकलन, गणितीय क्रिया, इंग्रजी सुधार, आनंददायी अभ्यासक्रम, ‘गुढीपाडवा पट वाढवा’ यासारखे उपक्रम प्रभावीपणे राबविले जात आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाच्या शिक्षण विभागाने बिहारच्या शिक्षण विभागाला सातारा पॅटर्नची माहिती घेण्यास सांगितले होते.त्या दृष्टीने बिहारच्या शिक्षण विभागाचे अतिरिक्त सचिव रविशंकर सिंग, उपसंचालक अब्दुल कलाम अन्सारी, पाटण्याचे शिक्षणाधिकारी तन्वीर आलम, कार्यक्रमाधिकारी चंदन प्रताप, प्रथम संस्थेचे मच्छिंद्र पटरा यांनी जिल्ह्यातील शाळांना भेटी दिल्या. जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, शिक्षण सभापती तेजस्विनी कदम, मुख्‍य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन आदींनी पथकाचे स्वागत केले. शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी उपक्रमांची माहिती दिली.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Sakal

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम जाणून घेण्यासाठी बिहारच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी सातारा जिल्ह्याला भेट दिली | Achira News