शहराध्यक्षपद शोभेचे? विधानसभा निवडणुकीत आमदार शंकर जगताप यांच्या उमेदवारीला नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी विरोध केला होता. पक्षात नाहक बंडाळी नको म्हणून पक्ष संघटनेत काहीच कार्य नसताना, त्यांना ऐन निवडणुकीत पक्षाचे शहर कार्याध्यक्ष पद बहाल करून शांत करण्यात आले. त्यानंतर शहराध्यक्षपदाची रितसर निवडणूक झाली. शहराध्यक्ष असतानाही काटे यांना पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत कोणतेही निर्णय घेण्याचे अधिकार नव्हते. पक्षाच्या चार आमदारांनी उमेदवार निश्चित करण्याचे निर्णय घेतले. त्यामुळे शहराध्यक्ष पद हे केवळ शोभेचे ठरले. ऐन निवडणुकीत प्रचारात निगडी येथे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शहराध्यक्ष काटे यांचे जाहीरपणे कान टोचले होते. पिंपळे सौदागर प्रभागातील पक्षाचे सर्वच्या सर्व चार उमेदवाराचे पॅनेल निवडून आणा, असे आदेश त्यांनी त्यांना दिला होते. मात्र, संपूर्ण पॅनेल निवडून आणण्यात काटे हे अपयशी ठरले.
पक्षीय राजकारणः महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत केट यांचा सत्तासंघर्ष
Pudhari•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.