Achira News Logo
Achira News

पक्षविरोधी कारवाया सुरू असताना काँग्रेसने नेतृत्वात बदल केले

Lokmat
पक्षविरोधी कारवाया सुरू असताना काँग्रेसने नेतृत्वात बदल केले
Full News
Share:

सातारा :कराडउत्तर ब्लॉककाँग्रेसचेअध्यक्ष श्रीनिवास थोरात यांनी दिलेला राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. तसेच खटाव ब्लॉककाँग्रेसचेअध्यक्ष सदाशिव खाडे यांच्या पक्षविरोधी कारवायांची दखल घेऊन त्यांना अध्यक्षपदावरून हटवण्यात आले आहे. या दोन्ही पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबित केले आहे, अशी माहिती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी दिली आहे.प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतकराडउत्तर ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास थोरात हे भाजप व अपक्षांचा प्रचार करीत असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा काँग्रेसकडे दिला आहे. संबंधित राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. थोरात यांना पदमुक्त केले आहे. काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी थोरात यांचे कोणतेही आदेश विचारात घेऊ नयेत. आता त्यांचा काँग्रेस पक्षाशी काहीही संबंध राहिलेला नाही.खटाव ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांना कातरखटाव जिल्हा परिषद मतदार संघात पक्षाची अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती. परंतु त्यांनी निवडणुकीतून माघार घेऊन विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करीत आहेत. सदाशिव खाडे हे काँग्रेसच्या उमेदवाराविरोधी प्रचार करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. संबंधित तक्रारीची शहानिशा केली असता, त्यात तथ्य आढळल्याने सदाशिव खाडे यांना पदावरून हटवले असून, त्यांना काँग्रेस पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. खटाव ब्लॉक काँग्रेसच्या रिक्त झालेल्या अध्यक्षपदी प्रभारी अध्यक्ष म्हणून परेश जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

पक्षविरोधी कारवाया सुरू असताना काँग्रेसने नेतृत्वात बदल केले | Achira News