Achira News Logo
Achira News

पाकिस्तानी क्रिकेटपटूला करारबद्ध केल्याबद्दल आयपीएल फ्रँचायझी मालकाचा निषेध

Maharashtra Times
पाकिस्तानी क्रिकेटपटूला करारबद्ध केल्याबद्दल आयपीएल फ्रँचायझी मालकाचा निषेध
Full News
Share:

मुंबई:लोकप्रिय आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादच्या मालक काव्या मारनला 'द हंड्रेड' स्पर्धेत त्यांच्या सनरायझर्स लीड्स संघासाठी एका पाकिस्तानी क्रिकेटपटूला खरेदी केल्यामुळे प्रचंड द्वेष आणि टीकेला सामोरे जावे लागत आहे. काव्या मारनला सनरायझर्स लीड्ससाठी पाकिस्तानी क्रिकेटपटू अबरार अहमदला खरेदी केले. या वादानंतर क्रिकेटपटू अबरार अहमदने आपली प्रतिक्रिया दिली आहे.अलीकडीलद हंड्रेड स्पर्धेसाठीच्या लिलावात, सनरायझर्स लीड संघासाठी पाकिस्तानी स्टार खेळाडू Abrar Ahmed 1,90,000 पौंडांना खरेदी केले. या निर्णयानंतर, संघ व्यवस्थापन आणि मालकांना प्रचंड टीकेला सामोरे जावे लागत आहे. भारतीय क्रिकेट तज्ञ आणि दिग्गजांनीही काव्या मारन यांच्या या निर्णयावर टीका केली आहे.अबरार अहमदची प्रतिक्रियाया करारानुसार काव्या मारन यांच्या सनरायझर्स लीड्स संघाने मिळवलेला पाकिस्तानी खेळाडू अबरार अहमद , "कोणत्याही टीकेची किंवा विरोधाची चिंता करत नाही. टेलिकॉम एशिया स्पोर्टच्या एका वृत्तानुसार, अबरार शांत आहे आणि द्वेषपूर्ण भाषणाकडे लक्ष देत नाही. मला काहीच आश्चर्य वाटले नाही. कारण अशा प्रकारचा प्रतिसाद मिळणार याची मला आधीच कल्पना होती. त्यामुळे या वादाबाबत मला अजिबात चिंता नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने देखील सदर विषय केवळ इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड आणि संबंधित फ्रँचायझी यांच्यापुरताच मर्यादित आहे."लिलावानंतर, प्रशिक्षक डॅनियल व्हेटोरी यांनी स्पष्ट केले की, आदिल रशीदला खरेदी करता न आल्यामुळे त्यांना दुसऱ्या लेग-स्पिनरला लक्ष्य करावे लागले. ते म्हणाले, "आदिल रशीदला खरेदी करणे हे आमचे प्राधान्य होते, पण ते शक्य झाले नाही. त्यामुळे, आम्ही परदेशी फिरकीपटूंचे पर्याय शोधू लागलो. आम्ही 4-5 खेळाडूंचा विचार करत होतो आणि अबरार त्यापैकी एक होता. तो संघात आल्याने आम्हाला खूप आनंद झाला आहे."डॅनियल व्हेटोरीने हे देखील उघड केले की, संघाने कोणत्याही पाकिस्तानी खेळाडूंना खरेदी न करण्याबाबत व्यवस्थापनात कोणतीही चर्चा झाली नव्हती. पूर्वीच्या वृत्तांनुसार, आयपीएल संघ लिलावात पाकिस्तानी खेळाडूंकडे दुर्लक्ष करतील असे म्हटले जात होते.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

पाकिस्तानी क्रिकेटपटूला करारबद्ध केल्याबद्दल आयपीएल फ्रँचायझी मालकाचा निषेध | Achira News