IPL 2025, PBKS vs RR Live Match Updates:आयपीएल २०२५ मधील आजचा डबल हेडरमधील दुसरा सामना पंजाब किंग्स वि. राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळवला जात आहे. या सामन्यातून राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन पुन्हा संघाचं नेतृत्त्व करताना दिसणार आहे. तर विजयाच्या रथावर स्वार असलेला पंजाब किंग्सचा संघ आपला सलग तिसरा विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. Punjab Kings vs Rajasthan Royals Live Cricket Score Updates: पंजाब किंग्स वि. राजस्थान रॉयल्स सामन्याचे लाईव्ह अपडेट्स लॉकी फर्ग्युसनच्या वेगवान चेंडूवर यशस्वी जैस्वाल त्रिफळाचीत झाला. यशस्वीने ४५ चेंडूत ६७ धावांची खेळी केली. यामध्ये ३ चौकार, ५ षटकारांचा समावेश होता. पंजाबला १० षटकं संघर्ष केल्यानंतर विकेट मिळाली आहे. लॉकी फर्ग्युसनने संजू सॅमसनला बाद केलं. संजूने २६ चेंडूत ३८ धावांची खेळी केली. यशस्वी जैस्वाल आणिसंजू सॅमसनयांनी मुल्लापूर इथे सुरू असलेल्या पंजाबविरुद्धच्या लढतीत मनमुराद फटकेबाजी करत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. यशस्वी जैस्वाल आणि कर्णधारसंजू सॅमसनयांनी पॉवरप्लेच्या ६ षटकांमध्ये ५१ धावा वसूल केल्या. पंजाब किंग्स वि.राजस्थान रॉयल्ससामन्याला सुरूवात झाली आहे. राजस्थानकडूनसंजू सॅमसनआणि यशस्वी जैस्वालची जोडी उतरली आहे. तर अर्शदीप सिंगने गोलंदाजीला सुरूवात केली आहे. प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक),श्रेयस अय्यर(कर्णधार), मार्कस स्टॉइनिस,नेहल वढेरा,ग्लेन मॅक्सवेल, शशांक सिंग, सूर्यांश शेडगे, मार्को जॅनसेन,अर्शदीप सिंग,लॉकी फर्ग्युसन, युझवेंद्र चहल यशस्वी जैस्वाल,संजू सॅमसन(कर्णधार), नितीश राणा, रियान पराग, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक),शिमरॉन हेटमायर,वानिंदू हसरंगा,जोफ्रा आर्चर,महेश थेक्षाना, युधवीर सिंग चरक, संदीप शर्मा पंजाब किंग्सने राजस्थानविरूद्ध सामन्याची नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला आहे. पंजाबच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणताच बदल करण्यात आलेला नाही. तर राजस्थाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आला आहे. संजू सॅमसन (कर्णधार), रियान पराग, शुभम दुबे, वैभव सूर्यवंशी, कुणाल राठोड,शिमरॉन हेटमायर,यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, नितीश राणा, युधवीर सिंग,जोफ्रा आर्चर,महेश थेक्षाना, वानिंदू हसरंगा, आकाश मधवाल,कुमार कार्तिकेयसिंह, तुषार देशपांडे, फजलहक फारूकी, क्वेना माफाका, अशोक शर्मा, संदीप शर्मा. श्रेयस अय्यर (कर्णधार), प्रियांश आर्य, प्याला अविनाश, हरनूर सिंग, जोश इंग्लिस, प्रभसिमरन सिंग, विष्णू विनोद,नेहल वढेरा,अजमतुल्ला उमरझाई, ॲरॉन हार्डी, मार्को यान्सन,ग्लेन मॅक्सवेल,मुशीर खान, शशांक सिंग, मार्कस स्टोइनिस, सूर्यांश शेडगे, अर्शदीप सिंह, झेव्हियर बार्टलेट, युझवेंद्र चहल, प्रवीण दुबे, लॉकी फर्ग्युसन, हरप्रीत ब्रार, कुलदीप सेन, विजयकुमार वैशाख, यश ठाकूर
पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स, आयपीएल 2025 डबल हेडर
Loksatta•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Loksatta
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.