Achira News Logo
Achira News

पुणे गुन्हे शाखेने हत्येचा प्रयत्न हाणून पाडला, चार संशयितांना अटक

Lokmat
पुणे गुन्हे शाखेने हत्येचा प्रयत्न हाणून पाडला, चार संशयितांना अटक
Full News
Share:

पुणे:किरकोळ वादातून एकाचा खून करण्यासाठी कोयते बाळगणाऱ्या चौघांना गुन्हे शाखेच्या युनिट सहाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून कोयते, गिलवर, दुचाकी असा ८१ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई १७ मार्च रोजी मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास हडपसरमधील लक्ष्मी माता मंदराजवळ करण्यात आली. याप्रकरणी आरोपींविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अंमलदार शेखर काटे यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे गुन्हे शाखेच्या युनिट सहामध्ये कार्यरत असून, १७ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी दुचाकीवरून चौघेजण प्रवास करत असल्याचे त्यांना दिसून आले. संशय आल्यामुळे त्यांनी संबंधितांना गाडी थांबवून खाली उतरवले. त्यांची अंगझडती घेतली असता, आरोपींकडे कोयते आणि गिलवर असे साहित्य मिळून आले. चौकशीत त्यांनी एकाचा खून करण्यासाठी प्लॅनिंग केल्याची कबुली दिली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार करत आहेत.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

पुणे गुन्हे शाखेने हत्येचा प्रयत्न हाणून पाडला, चार संशयितांना अटक | Achira News