पुणे:पुणेमहापालिकेच्या १६५ नगरसेवकांमध्ये ६१ नगरसेवकांनी पदवीपर्यंतचेशिक्षणघेतले आहे. तर दहावीपर्यंत शिकलेल्या नगरसेवकांची संख्या ४५ आहे. त्यामध्ये इयत्ता दुसरी, चौथी, आठवी, नववीपर्यंतशिक्षणघेतलेल्यांचा समावेश आहे. बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या नगरसेवकांची संख्या ३३ आहेत. केवळ १४ नगरसेवकांचे शिक्षण ‘पदव्युत्तर पदवी’पर्यंत झाले आहे. पुणे महापालिकेची निवडणूक झाली. त्यात ४१ प्रभागांतून १६५ नगरसेवक निवडून आले. त्यात भाजपच्या ११९ , राष्ट्रवादीकाँग्रेस(अजित पवार ) २७, राष्ट्रवादीकाँग्रेस(शरद पवार) ३ , काँग्रेसचे १५ आणि उद्धवसेना पक्षाचा १ उमेदवार निवडून आलेला आहे. पुणे शहराचा कारभार हे नगरसेवक हाकणार आहेत. महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरताना इच्छुकांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे. या १६५ सदस्यांपैकी ३५ टक्के म्हणजे ६१ नगरसेवकांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले आहे. तर केवळ ८ टक्के सभासदांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. सर्वसाधारण २० टक्के म्हणजे ३३ सदस्यांचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. तर, २५ टक्के म्हणजे ४५ सदस्य दहावीपर्यंत शिकलेले आहेत. पदविका मिळविलेले सदस्य : ५पदव्युत्तर शिक्षण : १४बारावीपर्यंत शिक्षण घेतलेले : ३३दहावीपर्यंत शिकलेले नगरसेवक : ४५पदवी घेतलेले सभासद : ६१शिक्षणाची माहिती उपलब्ध नसलेले नगरसेवक : ७
पुणे महानगरपालिका निवडणूकः निवडून आलेल्या नगरसेवकांच्या शैक्षणिक पातळीचा खुलासा
Lokmat•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.