लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी:गोवापर्यटन खात्याच्या सौजन्याने पणजी शिमगोत्सव समितीने घेतलेल्या चित्ररथ, रोमटामेळ, लोकनृत्य आणि वेशभूषा स्पर्धेचा निकाल बुधवारी समितीचे सचिव शांताराम नाईक यांनी जाहीर केला. चित्ररथ स्पर्धेत बांदोडा येथील महालक्ष्मी नागरिक समितीने प्रथम बक्षीस पटकावले. रोमटामेळ स्पर्धेत प्रथम बक्षीस शिरोडा येथील श्री मंडलेश्वर मानगुरू शिमगोत्सव समितीने तर लोकनृत्य स्पर्धेचे बक्षीस सावईवेरेंचो सख्याहरीने पटकावले. वेशभूषा स्पर्धेत लहान गटात प्रथम बक्षीस आराध्या कदम हिने तर मोठ्या गटातील प्रथम बक्षीस धनंजय नाईक यांनी पटकावले. चित्ररथ स्पर्धा प्रथम : महालक्ष्मी नागरिक समिती, द्वितीय- त्रिवेणी कला संघ दुर्भाट, तृतीय देव धाडेश्वर स्पोर्ट्स अँड कल्चरल लोकनृत्य स्पर्धा प्रथम : सावईवेरेचो सख्याहरी, द्वितीय-विजया कला मंडळ फोंडा, तृतीय- तिटो स्पोर्ट्स कल्चरल क्लब पैंगीण, चौथे-श्री गुरु कला मंडळ प्रियोळ, पाचवे-रामेश्वर कला संघ सत्तरी, उत्तेजनार्थ-शांतादुर्गा शिवरंजनी कला संघ कुर्टी, फोंडा, परशुराम कला क्रीडा संघ पैंगीण. क्लब, नेरुल, चौथे दाडसाखळ स्पोर्टस अँड कल्चरल क्लब, माशेल, पाचवे-श्रीकृष्ण हौशी मंडळ, मडगाव, उत्तेजनार्थ बाल गोपाळ कला सांस्कृतिक मंडळ, चिंचवाडा-चिंबल, श्री देव राष्ट्रोळी कला मंडळ, मरड- म्हापसा, हनुमान युवक संघ, रेईशमागूश, श्री शिवबा कला मंडळ, दुर्भाट, शिवराय युवक मंडळ, सांगे, रासई युथ असोसिएशन, लोटली, काद्रेश्वर मंडळ, कुचेली, राखणेश्वर युवक संघ बोरी, तालीगाव युथ, श्री सातेरी युवक मंडळ दोनापावल यांनी पटकावले. वेशभूषा स्पर्धा (छोटा गट) प्रथम : आराध्या कदम, द्वितीय- धृती नाईक, तृतीय- कियान नाईक, चौथे-मयुरी कोरगावकर, पाचवे - यशवी बोरकर, उत्तेजनार्थ- आर्ष मयेकर, प्रांजल सातार्डेकर, अनन्या मठकर, त्रिशा नाईक, तनुश्री वाडीकर, अनैशा हळदणकर, श्रणय नाईक, प्रियल वळवईकर, आयंश नाईक, श्रेयन उदयकर. रोमटामेळ स्पर्धा प्रथम : मंडलेश्वर मानगुरू शिमगोत्सव शिरोडा, द्वितीय- सुयोग शिमगोत्सव मंडळ आडपई, तृतीय - खांडेपार शिमगोत्सव समिती, चौथे- कुडचडे काकोडा शिमगोत्सव मंडळ, पाचवे-स्वरसाई शिमगोत्सव मंडळ म्हापसा, उत्तेजनार्थ- हिंदवी स्वराज देववाडी, दीवाडी, अवेडकर समाज बोरी, डोंगरी शिमगोत्सव समिती, श्री नवदुर्गा शिमगोत्सव समिती मडकई, शांतादुर्गा बाबरेश्वर युवक संघ कळंगुट, श्री पाईकदेवदेव शिमगोत्सव समिती सांगे, श्री चंद्रेश्वर भूतनाथ शिमगोत्सव मंडळ पारोडा, श्री शांतादुर्गा लक्ष्मी नरसिंह संस्थान सांकवाळ, श्री राम विश्वकर्मा शिमगोत्सव समिती वास्को, श्री शिवशक्ती मंडळ आल्त बेती.
पणजी शिमगोत्सव समितीने गोवा पर्यटन विभागाच्या अंतर्गत स्पर्धेचे निकाल जाहीर केले
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.