Achira News Logo
Achira News

पुण्यातील व्यावसायिकांना सरकारी जमीन घोटाळ्याच्या आरोपातून मुक्तता

Lokmat
पुण्यातील व्यावसायिकांना सरकारी जमीन घोटाळ्याच्या आरोपातून मुक्तता
Full News
Share:

पुणे:मुंढवा येथील शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणात ‘अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी’ कंपनीचा संचालक दिग्विजय पाटील यांच्यासहपार्थ पवारयांना वगळण्यात आले आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी शीतल तेजवानी हिच्याविरुद्ध पोलिसांनी न्यायालयात १ हजार ८८६ पानांचे विस्तृत दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले असून, या जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानी हिच्यावरच केवळ आरोपांचे ठपका ठेवण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात शीतल तेजवानी हिच्यासह इतरांवरही गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे इतरांविरोधात लवकरच दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. पुण्यातील मुंढवा येथील ४० एकर शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानी ही मुख्य सूत्रधार असून, तिने बनावट कागदपत्रे आणि पॉवर ऑफ ॲटर्नीच्या जोरावर ही जमीन अमेडिया कंपनीला विकल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने शीतल तेजवानीला अटक केली आहे. या व्यवहारात सुमारे ३०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ही जमीन वनस्पतीशास्त्र सर्वेक्षण विभागाची असतानाही, बनावट कागदपत्रे तयार करून ती ‘अमेडिया एंटरप्रायझेस’ या कंपनीला विकल्याचा आरोप आहे. तिने निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या मदतीने जमिनीचे अवैध हस्तांतरण केल्याचे समोर आले आहे. शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि निलंबित तहसीलदार येवले, हेमंत गवंडे यांच्यावर फसवणूक, बनावटगिरी आणि गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी यांच्यावर बोपोडी व मुंढवा अशा दोन जमीन प्रकरणात पुण्यातील खडक पोलिसांत एकच गुन्हा नोंद झाला आहे. सद्यस्थितीत गुन्ह्याचा तपासपुणेपोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. सुमारे ३०० कोटी रुपयांचा हा व्यवहार असून, यात तेजवानीची मुख्य जबाबदारी असल्याचे आरोपपत्रात नमूद आहे. मात्र दोषारोपपत्रात सूर्यकांत येवले आणि दिग्विजय पाटील यांचा कोणताही उल्लेख नाही. या जमीन गैरव्यवहारात शीतल तेजवानीचा सहभाग असल्याने तिच्या विरोधात पोलिसांनी पुरावे गोळा करून हे दोषारोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये खटल्यासंबंधी महत्त्वाचे जबाबही पोलिसांनी नोंदविले आहे. दरम्यान, दिग्विजय पाटील यांच्यासह इतर आरोपींविरोधात पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून, त्यांच्या विरोधातही दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितले. पोलिस निरीक्षक अजय वाघमारे यांच्या पथकाने हे आरोपपत्र दाखल केले आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

पुण्यातील व्यावसायिकांना सरकारी जमीन घोटाळ्याच्या आरोपातून मुक्तता | Achira News