Achira News Logo
Achira News

पुदुच्चेरी निवडणूकः एन. रंगासामी यांच्या एआयएआरसीचा दणदणीत विजय, पुन्हा सत्ता मिळवली

Lokmat
पुदुच्चेरी निवडणूकः एन. रंगासामी यांच्या एआयएआरसीचा दणदणीत विजय, पुन्हा सत्ता मिळवली
Full News
Share:

पुद्दुचेरी :या केंद्रशासित प्रदेशातील ३० जागांच्या छोट्या पण राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील असणाऱ्या विधानसभेचा कौल पुन्हा एकदा स्थानिक अस्मिता आणि प्रस्थापित विश्वासाला बळकटी देणारा ठरला आहे. मुख्यमंत्री एन. रंगासामी यांनी थट्टनचावडीत दणदणीत विजय मिळवला असून, त्यांच्या ऑल इंडिया एन.आर. काँग्रेस (एआयएआरसी) नेतृत्वाखाली एनडीए आघाडीने बहुमतासाठीचा १६ जागांचा जादूई आकडा गाठून पुन्हा सत्ता कायम ठेवली आहे. स्थानिक नेतृत्वाचा प्रभाव... : पुद्दुचेरीच्या निवडणुकीवर प्रादेशिक चेहऱ्याचा मोठा प्रभाव राहिला आहे. एन. रंगासामी यांचा साधेपणा, त्यांची जनमानसातील ‘मक्कल थलैवर’ (लोकांचे नेते) अशी प्रतिमा यामुळे ते सत्ताविरोधी लाट थोपविण्यात यशस्वी ठरले. एनडीएचा दबदबा... : एआयएनआरसी आणि भाजप या दोन्ही पक्षांना ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही पट्ट्यांमध्ये समन्वयाचा फायदा मिळाला. काँग्रेस व द्रमुकच्या आघाडीने स्थानिक स्वायत्तता व नायब राज्यपालांसोबतच्या प्रशासकीय संघर्षाला प्रचाराचा मुख्य मुद्दा बनविले होते. परंतु, हा मुद्दा मतांमध्ये परावर्तित होऊ शकला नाही. विजय यांच्या पक्षाची एन्ट्री : पुद्दुचेरीच्या यंदाच्या रणसंग्रामात तमिळ चित्रपटसृष्टीतील अभिनेते विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (टीव्हीके) या पक्षाने पहिल्यांदाच आपले उमेदवार मैदानात उतरवून रंगत वाढवली.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

पुदुच्चेरी निवडणूकः एन. रंगासामी यांच्या एआयएआरसीचा दणदणीत विजय, पुन्हा सत्ता मिळवली | Achira News