पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर, उपमहापौरपदाचे उमेदवारी अर्ज भरताना भाजपने डावलल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) शहराध्यक्ष, नगरसेवक कुणाल वाव्हळकर यांनी नाराजी व्यक्त केली. भाजपकडून अन्याय केला जात आहे. पुण्यात भाजपाने रिपाइंला उपमहापौर पद देऊन युतीचा धर्म पाळला. त्याप्रमाणे पिंपरीत भाजपाने स्थायी समितीचे अध्यक्षपद पद देऊन अन्याय दूर करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. नगरसेवक वाव्हळकर म्हणाले, ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये प्रामाणिकपणे भारतीय जनता पक्ष व महायुतीसोबत काम करत आला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकही जागा मिळाली नसतानाही आंबेडकरी समाज आजही महायुतीसोबत ठामपणे उभा आहे. महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला १२८ पैकी पाच जागा देण्यात आल्या होत्या. त्यापैकी प्रभाग क्रमांक २५ मधून मी आणि प्रभाग क्रमांक १६ मधून धर्मपाल तंतरपाळे हे दोन उमेदवार निवडून आले.पुणेमहापालिकेत भाजपने रिपाइंला उपमहापौर पद दिले. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातील नेते, आमदारांना महायुतीच्या धर्माचा विसर पडला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली आहे. रिपाइंला स्थायी समितीचे अध्यक्षपद देऊन अन्याय दूर करावा’. रिपाइचे पाचही उमेदवार भाजपच्या कमळ चिन्हावरनिवडणूकलढले होते. त्यापैकी दोघे निवडून आले आहेत. पुण्यात भाजपने रिपाइचे परशुराम वाडेकर यांना उपमहापौर पद दिले आहे. त्याचधर्तीवर पिंपरीतील रिपाइलाही उपमहापौरपद मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु, भाजपने उपमहापौर पद दिले नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त करित आता स्थायी समितीचे अध्यक्षपद रिपाइने मागितले आहे. महापालिका निवडणुकीत भाजपची दुसऱ्यांदा एकहाती सत्ता आली आहे. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा पराभव केला. भाजपच्या चारही आमदारांनी यशस्वी रणनिती अवलंबून उपमुख्यमंत्रीअजित पवारयांच्यावर मात केली. भाजपचे सर्वाधिक ८४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ ३७ नगरसेवक निवडून आले. शिवसेना (शिंदे) पक्षाचे सहा आणि एक अपक्ष नगरसेवक निवडून आला आहे. भाजपकडून महापौरपदासाठी रवि लांडगे यांनी उमेदवारी अर्ज केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे रवि लांडगे यांची महापौरपदी बिनविरोध निवड निश्चित असून शुक्रवारी शिक्कामोर्तब होईल. उपमहापौरपदासाठी भाजपकडून शर्मिला बाबर यांनी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून वैशाली काळभोर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शुक्रवारी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.
पिंपरी-चिंचवाड महापौरपदाची उमेदवारीः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या नेत्याने भाजपबद्दल नाराजी व्यक्त केली
Loksatta•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Loksatta
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.