Watch These Low Budget Bollywood Movies : बॉलीवूड म्हटलं की भव्य-दिव्य चित्रपटांचा सेट, मोठे कलाकार आणि मोठं बजेट या गोष्टी डोळ्यांसमोर येतात. पण असं असतानाही बॉलीवूडमधील असे काही कमी बजेटमध्ये बनलेले चित्रपट आहेत, ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. बजेट कमी असलेल्या या चित्रपटांनी दमदार सादरीकरण आणि कथानकाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली. कमी बजेटचे सिनेमेही हिट होऊ शकतात आणि प्रेक्षकांची मनं जिंकू शकतात हे या चित्रपटांनी दाखवून दिलं. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली. ‘द कश्मीर फाइल्स’ ते ‘स्त्री’ आणि ‘सीक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटांचा या यादीत समावेश आहे. या यादीत कोणत्या बॉलीवूड कलाकारांच्या चित्रपटांचा समावेश आहे त्याबद्दल जाणून घेऊयात… द कश्मीर फाइल्स – विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला. १९९० मध्ये कश्मिरी पंडितांबरोबर घडलेल्या वाईट प्रसंगावर हा चित्रपट आधारित आहे. त्यामध्ये अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती आणि पल्लवी जोशी हे कलाकार पाहायला मिळतात. हा चित्रपट १५ कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आलेला; परंतु बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने तब्बल ३४१ कोटींचा गल्ला जमावला. तनू वेड्स मनू – आनंद एल. राय यांचा २०११ मध्ये प्रदर्शित झालेला हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. त्यामध्ये कंगना रणौत आणि आर. माधवन प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. एका छोट्याशा गावातून आलेली स्त्री आणि एनआरआय डॉक्टर यांची गोष्ट यामध्ये पाहायला मिळते. १७ कोटींमध्ये हा चित्रपट बनवण्यात आलेला; पण बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने ८८.७२ कोटींची कमाई केली. स्त्री – ‘स्त्री’ हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. अभिनेताराजकुमार रावव श्रद्धा कपूर यामध्ये मुख्य भूमिकांमध्ये आहेत. अमर कौशिक दिग्दर्शित या चित्रपटात पंकज त्रिपाठी यांच्या कॉमिक टायमिंगनेही प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आणि कथानकात रंगत आणली. २० कोटींमध्ये हा चित्रपट बनवण्यात आलेला. तर श्रद्धा कपूरची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटानं १८०.७६ कोटींचा गल्ला जमवला होता. त्यानंतर ‘स्त्री’चा दुसरा भागदेखील प्रदर्शित झाला. विकी डोनर –आयुष्मान खुरानाव यामी गौतम यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट २०१२मध्ये प्रदर्शित झालेला. फक्त १५ कोटींचं बजेट असलेल्या या चित्रपटानं तब्बल ६६.३१ कोटींचा गल्ला जमावलेला. हा चित्रपट सुपरहिट ठरलेला. सिक्रेट रॉक्स्टार – आमिर खानची निर्मिती असलेल्या या चित्रपटात एक लहान मुलगी गायिका होण्यचं स्वप्न पाहत असते आणि तिच्या कलेच्या जोरावर स्वत:ची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते. त्यामध्ये हिंसाचार आणि महिलांना घरात मिळणारं दुय्यम स्थान यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. या चित्रपटाचं बजेट १५ कोटी इतकं होतं; पण या चित्रपटानं जगभरात ९६५ कोटींची कमाई केली. हा २०१७चा ब्लॉकबस्टर भारतीय चित्रपट ठरला होता. बरेली की बर्फी – अश्विनी अय्यर तिवारी दिग्दर्शित हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. यामध्ये राजुकमार राव, आयुष्यमान खुराणा वक्रिती सेनॉनप्रमुख भूमिकांमध्ये पाहायला मिळतात. २० कोटींचं बजेट असलेल्या या चित्रपटानं ५८.७५ कोटीची कमाई केलेली. पान सिंह तोमर – दिवंगत अभिनेते इरफान खान यांची मुख्य भूमिका असलेला हा एक राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट आहे. सात कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटानं २०.१८ कोटींची कमाई केलेली. शुभ मंगल सावधान – आयुष्यमान खुराना व भूमी पेडणेकर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला. आयुष्मान व भूमी यांनी पहिल्यांदाच यामधून एकत्र काम केलेलं. त्यामुळे या फ्रेश जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्रीसुद्धा प्रेक्षकांना खूप भावलेली. २५ कोटींचं बजेट असलेल्या या चित्रपटानं ६४ कोटींचा गल्ला जमवला होता.
प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणारे कमी बजेटचे बॉलीवूड चित्रपटः बॉक्स ऑफिसवरील यशस्वी चित्रपटांची यादी
Loksatta•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Loksatta
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.