नदीच्या निळ्या व लाल पुररेषेतील अनधिकृत बांधकामांचे महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयनिहाय सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार शहरात नद्याच्या पात्रालगत व पूररेषेत निवासी, व्यावसायिक बांधकामे असे एकूण 2 हजार 917 बांधकामे आढळून आली आहेत. त्यामध्ये निवासी 1 हजार 508, व्यावसायिक 1 हजार 382 आणि इतर 27 अशी बांधकामे आहेत. आता त्या आकडेवारीत मोठी भर पडली आहे. त्या सर्व बांधकामाना नोटीस देऊनही राजकीय दबावामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तत्कालिन आयुक्त शेखर सिंह यांनी कारवाई थांबवली. त्यानंतर महापालिका निवडणुकही झाली. मात्र, प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने पूर रेषेत बांधकामे व पत्राशेड जोरात सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. महापालिकेचे नवे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शहरातील कोणत्याही अनधिकृत बांधकामांना थारा देणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्याबाबत क्षेत्रीय अधिकार्यांना जबाबदार धरणार असे, त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आयुक्तांच्या काळात तरी शहरातील अनधिकृत बांधकामांना लगाम बसतो का, नियमितपणे कुदळवाडीप्रमाणे कारवाई होते का, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
पुराच्या मैदानातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची महानगरपालिकेची घोषणा
Pudhari•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.