सोशल मीडियावरून अभिनयाच्या जगात आपली वेगळी ओळख निर्माण करणारी प्राजक्ता कोळी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. यावेळी कारण आहे तिचा अभिनय नव्हे, तर तिचा जबरदस्त स्टायलिश लुक. Mismatched Season 4 च्या अधिकृत घोषणा कार्यक्रमात प्राजक्ता कोळीने कॅरी केलेला फ्लोरोसेंट ग्रीन शर्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तिचा हा लुक इतका आकर्षक होता की चाहत्यांसह फॅशन तिच्या स्टाइलची विशेष दखल घेतली.चाहत्यांची फेव्हरेट लव्हस्टोरी Mismatched आता पु्न्हा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.या खास इव्हेंटमध्ये प्राजक्ता कोळीने तिच्या ग्लॅमरस लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जाणून घेऊयात या खास प्रसंगी प्राजक्ताचा लुक कसा होता. (फोटो सौजन्य :- योगेन शाह)फ्लोरोसेंट ग्रीन शर्ट आणि ब्लॅक कॉम्बिनेशनया खास प्रसंगी प्राजक्ताने फ्लोरोसेंट ग्रीन शर्ट रंगाचा शर्ट कॅरी केला होता. पण हा भडक रंग तिने ब्लॅक जॅकेटसह कॅरी करून हा लुक परफेक्ट बॅलन्स केला. शर्टच्या ब्राइटनेसमुळे लगेचच लक्ष वेधले जात होते, तर ब्लॅक जॅकेटमुळे लुकला सॉफ्ट, स्टायलिश आणि एलिगंट टच मिळाला. तिने मॅन्युअली मिनिमल मेकअप निवडला, ज्यात नैसर्गिक ग्लो आणि सॉफ्ट लिपशेड हायलाइट होता, ज्यामुळे संपूर्ण लुक अधिक फ्रेश आणि अॅवरेटेबल दिसत होता.सिंपल मेकपअप्राजक्ता कोळीचा लुक अधिकच ताजेतवाने आणि नैसर्गिक दिसण्यासाठी तिने सिंपल मेकअप केला होता. हलकी फाउंडेशन, नैसर्गिक ग्लो, सॉफ्ट लिपशेड आणि सूक्ष्म आई मेकअपने तिचा लुक हलका, परंतु आकर्षक बनवला. प्राजक्ता, जी ‘MostlySane’ म्हणून तिच्या सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे, नियमितपणे तिच्या मेकअप टिप्स आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या हेअरस्टाइलपासून मेकअपपर्यंत प्रत्येक गोष्ट तिने सहज पद्धतीने सादर केली आहे.डिंपलची आठवणप्राजक्ता कोळीचा हा ग्लॅमरस लुक पाहून लगेच तिच्या Mismatched मधील डिंपल या पात्राची आठवण झाली. फ्लोरोसेंट ग्रीन शर्ट आणि ब्लॅक जॅकेटमधील स्टाइल तिच्या ऑन-स्क्रीन डिंपलसारखीच जिवंत, उत्साही आणि आत्मविश्वासपूर्ण दिसत होती. नैसर्गिक सिंपल मेकअप आणि सॉफ्ट वेव्ह्ड हेअरस्टाइलमुळे डिंपलची तोच हलका, परंतु आकर्षक व्यक्तिमत्त्व दिसत होते, जे चाहत्यांच्या मनात घर करून गेले आहे.गोल्डन इयररिंगने पूर्ण केला लुकप्राजक्ता कोळीचा हा ग्लॅमरस लुक फक्त शर्ट आणि जॅकेटपुरता मर्यादित राहिला नाही, तर तिने गोल्डन इयररिंग्स घालून हा लुक परिपूर्ण केला. साध्या, पण स्टायलिश इयररिंग्समुळे तिच्या फेस आणि मेकअपवर अधिक लक्ष वेधले गेले आणि लुकला एक एलिगंट टच मिळाला. कमीत कमी दागिने कॅरी करून तिने हा लुक पूर्ण केला.गोल्डन वॉचने पूर्ण केला लुकप्राजक्ता कोळीचा ग्लॅमरस लुक फक्त फ्लोरोसेंट ग्रीन शर्ट आणि ब्लॅक जॅकेटपुरता मर्यादित राहिला नाही. तिने गोल्डन इयररिंग्ससहच नव्हे तर स्टायलिश गोल्डन वॉच घालून हा लुक पूर्ण केला.सोनेरी अॅक्सेसरीजमुळे तिच्या फेसवर आणि हातावर अतिरिक्त एलिगंट टच आला, ज्यामुळे संपूर्ण लुक अधिक बॅलन्स्ड आणि रिफाइंड दिसत होता.
'प्राजक्ता कोली'च्या ग्लॅमरस लूकने'मिसमॅच्ड सीझन 4'च्या घोषणेतील कार्यक्रम लपवला
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.