नवी दिल्ली :राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाही. या स्पर्धेत नाही, असे पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी स्पष्ट करत नेतृत्वाच्या वादातून काढता पाय घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे सुनेत्रा पवार यांची अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता आहे. अजित पवार व शरद पवार यांच्यामध्ये कथित विलीनीकरणाबाबत चर्चा झाल्याच्या मुद्द्यावर पटेल यांनी स्पष्ट उत्तर देणे टाळले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र लढण्याचा निर्णय झाला होता, असे पटेल यांनी नमूद केले. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांचा पक्ष प्रफुल पटेल व सुनील तटकरे या दोन नेत्यांनी ताब्यात घेतल्याची टीका होऊ लागली आहे. पटेल हेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र लिहून त्यांनीच अध्यक्ष होण्याची विनंती केली आहे. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतरही प्रफुल पटेल यांच्याभोवतीचा वाद शमलेला नाही. त्या संदर्भात मंगळवारी दिल्लीतील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये, योग्य व्यक्तीच राष्ट्रीय अध्यक्ष होईल व माझ्याव्यतिरिक्त दुसरी व्यक्ती हे पद सांभाळेल, असे स्पष्टीकरण पटेल यांनी दिले. मी अध्यक्ष होणार असे कधीही म्हणालो नाही.राज ठाकरेवा इतर कोणी नेत्याचा आमच्या पक्षाशी संबंध काय, असा प्रश्न पटेल यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घडी पूर्णपणे बसवण्याला आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा विषय सध्या आमच्यासमोर नाही. उपमुख्यमंत्री, विधिमंडळ पक्षनेता नियुक्त केला असून आता राष्ट्रीय अध्यक्ष नियुक्त केला जाईल. विलीनीकरणाचे पुढे बघू, असेही पटेल म्हणाले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडेपुणेआणि बीड जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.अजित पवारयांच्याकडे या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी होती. त्यात बदल करण्यात आला नाही.
प्रफुल्ल पटेलांचा अजित पवारांना राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा
Loksatta•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Loksatta
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.