Today's Breaking Marathi News Live Updates in Marathi:राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत आपण नसल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं असून सुनेत्रा पवार यांच्या निवडीचे संकेत दिले आहेत. तसंच, विविध नेत्यांच्या दाव्यांमुळे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चाही पुन्हा रंगण्याची शक्यता आहे.अजित पवारयांनी अपघाती मृत्यूपूर्वी एक फोन केल्याचं चौकशीत समोर आलंय. तिकडे, राजधानी दिल्लीत लोकसभेत वातावरण तापल्याचं चित्र आहे. सत्ताधारी विरुद्ध विरोधकांमुळे जोरदार वाक्-युद्ध पाहायला मिळतंय. सभापतींच्या दिशेनं कागद भिरकावल्यानं सहा खासदारांना काल निलंबित करण्यात आलंय. त्यावरून आता हा वाद अधिकच चिघळण्याची शक्यता आहे. ट्रम्प टॅरिफ आणि अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावरूनही बरीच उलटसुलट चर्चा सुरू आहे. क्रिकेट वर्तुळात टी-२० वर्ल्ड कपचे वारे वाहू लागलेत. या आणि अशा महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स... LIVE अजित पवारांनी भाजपसोबत जाताना आपले विचार खुंटीला टांगले नाहीत. अजित पवार राष्ट्रवादी चालवत होते. पटेल हे मोदी - शाह यांचे भक्त आहेत. पटेलांना पवार कुटुंबाचा मुखिया केलं आहे का? यांनी चिडचिड करू नये: शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचा टोला येत्या ११ फेब्रुवारीला होणाऱ्या मुंबई महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी येत्या शनिवारी, ७ फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. उमेदवारी अर्ज सादर झाल्यानंतर प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी १५ मिनिटे आधी अर्ज मागे घेण्याची संधी उमेदवाराला दिली जाणार आहे. ही निवडणूक आवाजी पद्धतीने हात उंचावून घेतली जाणार आहे. पीठासीन अधिकारी म्हणून पालिका आयुक्त भूषण गगराणी हे कामकाज सांभाळणार आहेत. "अजित पवारांच्या अपघाती मृत्यूबाबत फार सुरुवातीला मी बोललोय. जोवर माझ्यापर्यंत कुठलीही अधिकृत माहिती येत नाही तोपर्यंत मी अपघाताबाबत उगीच शंका घेणार नाही" - शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अपघातापूर्वी कार्यकर्त्याला केलेला अखेरचा कॉल रेकॉर्ड समोर आला आहे. अपघाताच्या दिवशी सकाळी ८ वाजून ३७ मिनिटांनी दादांचा हा अखेरचा कॉल कार्यकर्त्याला आला होता. हा कॉल रेकॉर्ड बारामतीत पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी ऐकवला. अखेरच्या कॉलवर अजितदादांनी, 'सर्व जातीधर्माला मी सोबत घेऊन जातोय आणि आपण सगळे एकत्र राहतोय. सगळ्यांना न्याय देण्याचं आपण नक्की काम करू. तू निवांत राहा असं म्हटलं होतं. (वाचा संपूर्ण बातमी) मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर गॅस टँकर उलटल्यानं काल संध्याकाळपासून मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. अद्यापही ती पूर्वपदावर आलेली नाही. ती सुरळीत करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अजूनही एक्स्प्रेस वेवर लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत, प्रचंड वाहतूक कोंडीत शेकडो वाहनं अडकून पडली आहेत. पुण्याकडून मुंबईकडे जाणारा प्रोपिलिन गॅसचा टँकर आडोशी बोगद्याजवळ उलटला. त्यातून काही काळ गॅसगळती झाल्यानं परिसरात घबराट पसरली होती. त्यामुळेच सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईकडे येणारी सर्व वाहतूक तातडीने थांबवण्यात आली होती.
प्रफुल्ल पटेलांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्षपदाचा उमेदवार नाकारला, सुनेत्रा पवारांना पर्याय सुचवला
Lokmat•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.