Achira News Logo
Achira News

प्रभावाखाली बेपर्वाईने वाहन चालवणाऱ्या सांगली चालकाला अटक

Lokmat
प्रभावाखाली बेपर्वाईने वाहन चालवणाऱ्या सांगली चालकाला अटक
Full News
Share:

सांगली: दारूच्या नशेत बेदरकारपणे मोटार चालवून १५ जणांना जखमी करत पाच मोटारी, दोन दुचाकींचे नुकसान करणाऱ्या चालक प्रणिकेत दत्तात्रय पांचाळ (वय २६, रा. कुलस्वामी रस्ता, लातूर) याच्याविरुद्धसांगलीशहरपोलिसांतगुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहतूकपोलिसलखन होवाळे यांनी फिर्याद दिली. जमावाने केलेल्या हल्ल्यात पांचाळ जखमी झाला असून, त्याच्यावर सिव्हिलमध्ये उपचार सुरू आहेत.मोटारचालक पांचाळ हा पुणे येथून प्रवासी घेऊन सांगलीत आला होता. सायंकाळी सातच्या सुमारास त्याने नशेत आपल्या ताब्यातील मोटार (क्र. एमएच १४ एलबी ४९००) चालवली. पटेल चौक ते गणपती मंदिर, टिळक चौक या मार्गावर त्याने वाहनांना धडक देत कृष्णामाई महाेत्सवाच्या बंदोबस्तासाठी नेमणुकीस असलेल्या चार पोलिसांसह १५ जणांना धडक देऊन जखमी केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.चालक पांचाळ याने नशेत बेदरकारपणे मोटार चालवून पाच मोटारींना तसेच दोन दुचाकींना धडक देत मोठे नुकसान केले आहे. टिळक चौकात एका दुचाकीला धडक देऊन त्याची मोटार थांबल्यानंतर संतप्त जमावाने त्याला मोटारीतून बाहेर ओढत मारहाण केली. पोलिसांनी जमावाच्या तावडीतून सुटका करत चालक पांचाळ याला ताब्यात घेतले. उपचारासाठी सिव्हिलमध्ये त्याला दाखल केले. वैद्यकीय तपासणीत पांचाळ याने दारू प्यायल्याचे स्पष्ट झाले आहे. दारूच्या नशेत वाहन चालवूनअपघातकेल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध पोलिस कर्मचारी लखन होवाळे यांनी फिर्याद दिली. सहायक फौजदार अमोल लोहार अधिक तपास करत आहेत.प्रवासी घेऊन सांगलीत आला होताचालक पांचाळ हा पुण्यातून प्रवासी घेऊन सांगलीत आला होता. प्रवाशांना तो छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ सोडणार होता. परंतु, वाटेत त्याने दारू प्यायल्यामुळे प्रवाशांनी त्याला खडसावले होते. सांगलीत प्रथमच आल्यामुळे त्याला रस्ते माहीत नव्हते. पटेल चौकातून त्याने बेदरकारपणे मोटार चालवत वाहनांसह पोलिसांना धडक दिली. जमावाने त्यास पकडल्यानंतर वाहनातील प्रवासी निसटले.जखमींमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेशचालक पांचाळ याने १५ जणांना धडक देत जखमी केले. यात अमया राजेंद्र खोत (वय ७) व वंदन सुनील फराटे (वय ३) या दोन चिमुकल्यांचा समावेश आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

प्रभावाखाली बेपर्वाईने वाहन चालवणाऱ्या सांगली चालकाला अटक | Achira News