Achira News Logo
Achira News

प्रेम, नाटक आणि अपमानः प्रेममध्ये एक वळण

Maharashtra Times
प्रेम, नाटक आणि अपमानः प्रेममध्ये एक वळण
Full News
Share:

लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 20 March 2026 च्या एपिसोडमध्ये पार्थ काव्यासाठी खास गजरा घेऊन येतो. मागच्या गुढीपाडव्याला जेव्हा त्याने तिच्यासाठी गजरा आणलेला असतो तेव्हा ती तो स्वीकारत नाही त्यामुळे त्याला आईचं नाव पुढे करून तो तिला द्यावा लागलेला असतो. यावेळी तो सगळं खरं कबूल करतो. मग स्वतःच्या हाताने तिला गजरा मारतो. इतक्यात त्यांना नंदिनीचा फोनवर बोलतानाचा आवाज ऐकू येतो. ती कोणाशी तरी रागात बोलत असते त्यामुळे ती दोघं लगेच बाहेर जातात आणि तिला विचारतात काय झालं? यावरनंदिनी फक्त काव्यालासांगते की माझा ब्लाऊज शिवायला टाकलेला तो टेलर काकांनी शिवलाच नाही. काव्या तिला शांत करते आणि म्हणते की ठीक आहे पुढच्या वेळेपासून आपण थोडं आधी देत जाऊ. नंदिनी पार्थ आणि काव्याचे छान फोटो काढते. पण त्यावेळी तिला काव्या बारीक आहे आणि आपण तिच्यासारखे नाही म्हणून कसंतरी वाटतं. ती तिथून निघून जाते.ती आपल्या रूममध्ये जीवाला बोलवायला जाते तेव्हा जीवा मुद्दाम कुर्त्यामध्ये अडकल्याचं नाटक करतो. पण यावेळीही नंदिनीला जीवासमोर जाण्याची लाज वाटत असते. ती आपले बाहू लगेचच शॉल झाकून घेते आणि जीवाला मदत करते. जीवा तिला विचारतो की तू शॉल का घेतली आहेस तेव्हा ती त्याला खोटं सांगते की मला थंडी लागते. खरंतर तिला जीवाला दुखी करायचा नसतं.मातृमुखी की पितृमुखी? Bharti Singh ने 3 महिन्यांनी दाखवला दुसरा लेक काजूचा चेहराबाहेर पार्थ ताव्याला बोलतो की गेल्यावर्षी जसा तुम्ही श्रीखंड बनवलेलं तसं यावर्षीही बनवा. इतक्यात मानिनी तिथे येते आणि म्हणते की यावर्षी काव्या काहीही बनवणार नाही. असा कुठे नियम आहे का की दरवर्षी बायकांनीच सणासुदीला गोडाधोडाचे पदार्थ बनवायचे. आजचा स्वयंपाक पार्थ करणार. हे ऐकल्यावर पार्थ थबकतो आणि म्हणतो की तुम्ही दोघांनी मिळून माझी वाट लावायची ठरवलंच आहे का! घरामध्ये बायकांची युती झाली आहे.काव्या आणि नंदिनी पैकी खट्याळ सून कोण? मानिनीनं दिलं उत्तरमी हे कुर्ता मध्ये वगैरे किचन मध्ये जाणार नाही. तेव्हा मानिनी त्याला म्हणते की आम्ही रोजसाड्या दागिनेवगैरे घालून स्वयंपाक घरात तुमच्यासाठी जेवण बनवत असतो. तुम्ही इथे एसीमध्ये बसलेला असता तेव्हा तुम्हाला जाणवत नाही का की आम्हालाही त्रास होतो. पार्थला बायकांचे दुःख समजत असतं. काव्या त्याला म्हणते की तुम्ही श्रीखंड शिकून घ्या उद्या समजा मी नसेल तर तुम्हाला ते बनवता आलं पाहिजे. यावर पार्थ लगेच म्हणतो की तुम्ही कुठे जाणार आहात... काव्या यावर उत्तर द्यायच्या आधीच तिथे रम्या येते आणि म्हणते की मी तिला घेऊन जाणार आहे!प्रसिद्ध डिझायनर Manish Malhotra चे हरपले मातृछत्र, वयाच्या 94 व्या वर्षी आईने घेतला जगाचा निरोपरम्याच्या मनात एक आणि ओठात एक असतं. तिला खरंतर काव्याला पार्थच्या आयुष्यातूनच काढायचं असतं पण आपलं चांगुलपणाचा नाटक दाखवण्यासाठी ती तिथे म्हणते की मी तिला माझं लग्न झाल्यावर करवली म्हणून घेऊन जाईल तेव्हा तुला तुझं करावंच लागेल ना. ती छान तयार होऊन आलेली असते. आज रम्या विजय मतकरीला भेटणार असते. घरातले सगळे तिला शुभेच्छा देऊन पाठवतात. कॅफेमध्ये ती दोघं भेटतात. त्यांची फॉर्मल बोलणी होतात. रम्या उगीच त्या विजयचा वेळ घेत असते. तिला फक्त त्याचा उपयोग करून पार्थला मिळवायचं असतं.देशमुखांच्या घरात सगळेजण मिळून गुढी उभारतात.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

प्रेम, नाटक आणि अपमानः प्रेममध्ये एक वळण | Achira News