निसर्ग आपला मित्र! हे सुवचन केवळ शाळेत फळ्यावर लिहिले जाते, मुलांकडून वाचून घेतले जाते, पण ते शिकणे राहून जाते. शिकून सवरून मोठे झाल्यावर लक्षात येते की, जगण्यात उतरणे तर दूरच; परंतु पर्यावरणाच्या ‘प’ ची ओळख देखील झालेली नसते. पर्यावरणाचा विचार करणाऱ्यांची, त्याविषयी बोलणाऱ्यांची, पर्यावरणपूरक जीवन जगणाऱ्यांची संख्या तर नगण्य दिसून येते. शालेय अभ्यासक्रमात पर्यावरण विषयाचे स्थानही नगण्य आहे, असे म्हटले तरी वावगे ठरू नये. इतर विषयांच्या तुलनेत पर्यावरण विषय कुणाच्या खिजगणतीतही नाही, कारण त्याची शंभर गुणांची परीक्षाच नाही. शिक्षक, विद्यार्थी, पालक सगळ्यांनाच अतिरिक्त वाटणारा विषय म्हणजे पर्यावरण! तो जीवनावश्यक असूनही त्याची ओळख देखील नसणे, ही तर खरी शोकांतिका आहे. मग पुढची पिढी केवळ आत्मकेंद्रित होत आहे, असा नाराजीचा सूर काढण्यावाचून आपल्या हाती काही उरत नाही.
पर्यावरण शिक्षणाचे विसरलेले महत्त्व
Pudhari•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.