नागपूर:राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालाची घोषणा करण्यात आली. मात्र, बारावीच्या परीक्षेदरम्यान तीन पेपरही फुटले होते. दरम्यान गोंदिया आणि वर्ध्यातील समुद्रपूर तालुक्यात जीवशास्त्राच्या पेपरदरम्यान ‘मास कॉपी’ केल्याचे २४३ विद्यार्थ्यांच्या पेपर तपासणीत उघडकीस आले.या विद्यार्थ्यांवर अनुशासनात्मक कारवाई करण्यात आली. अशी माहिती विभागीय शिक्षण मंडळ अध्यक्ष डॉ. शिवलिंग पटवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते ११ मार्च यादरम्यान झाली.तेव्हा सेंट उर्सुला येथे शिक्षकांच्या समयसुचकतेने केमेस्ट्रीचा व त्यानंतर गणित आणि फिजिक्सच पेपरही फुटल्याचे समोर आले.याप्रकरणी शिकवणी वर्ग संचालकांसह जयताळ्यातील एका शाळेचा संचालक आणि साथीदार अशा आठ जणांना अटक झाल्याने चांगलीच खळबळ उडाली होती.मात्र, वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील वाशी गावातील जे. डी. चौधरी कॉलेजमध्ये ११८ विद्यार्थ्यांनी तर गोंदिया जिल्ह्यातील कातुली येथील माऊली कनिष्ठ महाविद्यालयात १२५ विद्यार्थ्यांनी जीवशास्त्र विषयाच्या पेपरमध्ये कॉपी केल्याची पेपर तपासणीत उघड झाले. या विद्यार्थ्यांवर कारवाई करीत अनुत्तीर्ण करण्यात आल्याचे डॉ. पटवे यांनी सांगितले.विभागीय शिक्षण मंडळाकडून जीवशास्त्राचा पेपर तपासल्यावर त्यांना दोन केद्रांवरील २४३ विद्यार्थ्यांच्या पेपरमध्ये एकसारखे उत्तर लिहिले असल्याचे आढळले. ही माहिती मॉडरेटरला देण्यात आल्यावर त्यांनी बोर्डाला कळविले. त्यातून चौकशी समिती लावून या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. त्या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान या केंद्रावरील सर्वच शिक्षकांची चौकशीचे आदेश व ही केंद्रे तत्काळ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रश्नपत्रिका फुटणे आणि सामूहिक नक्कल घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर बाराव्या इयत्तेचा निकाल जाहीर
Sakal•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Sakal
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.