Achira News Logo
Achira News

पोलीस हवालदाराची योजना उघडकीस आलीः सागर भुजबलचा जमीन व्यवहार घोटाळा

Lokmat
पोलीस हवालदाराची योजना उघडकीस आलीः सागर भुजबलचा जमीन व्यवहार घोटाळा
Full News
Share:

सातारा : अंगात खाकी वर्दी असल्यामुळे त्याला कायद्याचे सर्व ज्ञान; पण याच कायद्याचा दुरुपयोग करून त्याने आपल्याच सहकाऱ्यांना गळ घालून नफा कमावण्याचं आमिष दाखवलं. प्लाॅट देतो, असे सांगून त्यानंपोलिसदलातील सहकाऱ्यांपासून आयटी इंजिनिअरपर्यंत सगळ्यांनाच गंडवलं. फसवणुकीची रक्कम डोईजड झाल्यानंतर त्याला ड्यूटीवर हजर न राहता मात्र परागंदा व्हावं लागलं. ही कहाणी आहे एकापोलिसकाॅन्स्टेबलची.सागर भुजबळ असं या पोलिस काॅन्स्टेबलचं नाव. खेळामध्ये प्रावीण्य मिळविलेला सागर पोलिस दलात भरती झाल्यानंतर तो साताऱ्यातील पोलिस प्रबोधनीमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून रुजू झाला. तो खेळाडू घडवत असताना दुसरीकडे मात्र त्याचे भलतेच उद्योग सुरू झाले. जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करतो, असे तो आपल्या जवळच्या सहकाऱ्यांना सांगू लागला.प्लाॅट खरेदीत झटपट पैसा मिळतोय, हे तो पटवून देऊ लागला. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून पोलिस दलातील काही पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला लाखोत पैसे दिले. जमीन व्यवहार खरा वाटावा म्हणून त्यानं दस्त, नोंदी सारी कागदपत्रे बनावट बनवली. एक-एक सावज हेरत तो पैसे उकळत गेला. अगदी आयटी इंजिनिअर, नोकरदार, सैन्य दलातील जवानाचे कुटुंब अशा सगळ्यांकडून त्याने पैसे उकळले; पण जेव्हा या गुंंतवणूकदारांकडून तगादा सुरू झाला तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन हादरली.एकीकडे नोकरीचे टेन्शन, तर दुसरीकडे बदनामी. या कसरतीत त्याने वडिलोपार्जित जमीनही देतो म्हणून आयटीआयचे क्लार्क धैर्यशील देशमुख यांना २५ लाखांना गंडा घातला. याच तक्रारीचा पहिला गुन्हा काॅन्स्टेबल सागर भुजबळवर दाखल झाला. त्यानंतर मात्र, त्याचे कारनामे आणखी समोर आल्यानंतर सारेच हादरले. कोणाकडून १० लाख, तर कोणाकडून १८ लाख, तर कोणाकडून ९ लाख, अशी रक्कम घेतल्याचा त्याच्यावर आरोप होत असून, सर्व कागदपत्रे घेऊन तक्रारदार पोलिस अधीक्षकांकडे धाव घेत आहेत.म्हणे, अंगातील वर्दीमुळे तो फसविणार नाही, याची खात्रीकधी तो जमीन व्यवहारात पैसे गुंतविण्यास सांगायचा, तर कधी शाळांसाठी लागणाऱ्या बॅगच्या कोट्यवधी रुपयांच्या टेंडरमधून नफा मिळवून देण्याचे आश्वासन द्यायचा. अंगात वर्दी असल्यामुळे तो फसविणार नाही, याची खात्री सगळ्यांनाच म्हणे होती; पण जेव्हा त्याचे फसवणुकीचे आकडे समोर आले तेव्हा सारेच अवाक् झाले. आपल्याच सहकाऱ्याविरोधात तक्रार देण्याची वेळ पोलिसांवर आली.या प्रकरणाची पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी दखल घेतल्यामुळेच काॅन्स्टेबल सागर भुजबळवर पहिला गुन्हा दाखल झाला. आता तक्रारदारांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अधीक्षकांनी यामध्ये लक्ष घालून फसलेल्या पोलिसांना व इतर नागरिकांना न्याय द्यावा, एवढीच अपेक्षा पीडित तक्रारदारांची आहे.यांची झाली फसवणूकधैर्यशील देशमुख २५, महाबळेश्वर पोलिस ठाण्यातील कॉन्स्टेबल प्रवीण जाधव ९ लाख ६० हजार, अन्य एक पोलिस कर्मचारी १५ लाख, जवानाची पत्नी १० लाख, आयटी इंजिनिअर मयूर कणसे १८ लाख, एक व्यावसायिक १.५० लाख, अशी फसवणुकीची रक्कम आहे. हा फसवणुकीचा आकडा आणखी वाढू शकतो, असे पोलिस सांगताहेत.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

पोलीस हवालदाराची योजना उघडकीस आलीः सागर भुजबलचा जमीन व्यवहार घोटाळा | Achira News