म.टा. प्रतिनिधी, पुणे:शहराच्या वेगवेगळ्या भागांत दुपारी झालेल्या पावसाच्या शिडकाव्याने सलग दुसऱ्या दिवशी उन्हाची तीव्रता जाणवली नाही. दुपारनंतर ऊन आणि ढगाळ वातावरण असा खेळ सुरू होता. संध्याकाळी गार वारा सुटल्याने आल्हाददायक वातावरण अनुभवायला मिळाले. त्यामुळे पाडव्याच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या पुणेकरांना उन्हाचा त्रास झाला नाही. पुणे शहराप्रमाणे जिल्ह्याच्या काही भागातही पावसाने हजेरी लावली.पावसामुळे उन्हाचा तडाखा कमीविदर्भ, मराठवाड्यामध्येगेल्या आठवड्यात उष्णतेची लाट आली होती; तर पुण्यामध्ये तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली होती. दिवसा उन्हाचे चटके आणि रात्री उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. मार्चमध्ये एवढा तीव्र उन्हाळा; तर एप्रिलमध्ये काय होणार, अशी शहरात चर्चा सुरू असताना हवामानातील घडामोडींमुळे बुधवारी वातावरण बदलले. भोर, वेल्हे, नसरापूर भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. पुण्यातही काही भागात पावसाच्या सरी बरसल्या, त्यामुळे उन्हाचा तडाखा कमी झाला.Unseasonal Rain: राज्यात अवकाळी, गारपिटीचा मारा; नाशिक, मराठवाड्यात पिकांचे नुकसान, पुण्यातही हजेरीगुरुवारीदेखील सकाळी काही भागात आकाश अंशतः ढगाळ होते. दुपारी दीडच्या सुमारास कोथरूड, कर्वेनगर, वारजे माळवाडी, सिंहगड रस्त्यावर पावसाच्या हलक्या सरी पडल्या. गुढीपाडव्याची सुट्टी असल्याने खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची काही वेळासाठी धांदल उडाली; पण मध्यवर्ती पुण्यात बाजारपेठांमध्ये पाऊस नसल्याने नागरिकांनी खरेदीचा मुहूर्त चुकवला नाही. दुपारनंतर सगळीकडेच ढगाळ वातावरण होते. दिवसभरात कमाल ३४ आणि किमान १९.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. सर्वाधिक तापमान ३६.३ अंश सेल्सिअस लोहगावमध्ये नोंदवले गेले. सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगरमध्येही पाऊस पडला.लातूरमध्ये गारपीट झाली.खेड तालुक्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची अवकाळी पावसाने कांदा झाकून ठेवताना प्रचंड धावपळ उडाली; तर अनेक ठिकाणी काढणीला आलेला कांदा, गहू पिकाचेदेखील नुकसान झाले.Gudi Padwa Unseasonal Rain : गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा हाहाकार, धाराशिव, जालना, सांगलीत गारपिटीचा तडाखा; शेतकरी हवालदिलठराविक ठिकाणीच पाऊस का?पावसाळ्यात ढग मोठ्या आकारात तयार झालेले असल्याने एकाच वेळी सर्वदूर सरी बरसतात; पण उन्हाळ्यातील ढग आकाराने लहान असतात. ज्या भागात ढग तयार होतात, तेथे ते बरसतात, त्यामुळे प्रत्येक वेळी संपूर्ण शहरात एकाच वेळी पाऊस पडतोच असे नाही. त्यामुळे दोन दिवसांपासून काही भागात जोरात पाऊस तर काही ठिकाणी केवळ ढगाळ वातावरण असे चित्र बघायला मिळाले. गुरुवारी कोथरूड, वारजे माळवाडी भागात पाऊस पडला; तर मध्यवर्ती पेठा कोरड्या होत्या. पुढील दोन दिवस शहरात दुपारनंतर आकाश ढगाळ राहणार असून, काही भागातढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यताआहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिली.
पावसामुळे पुण्याला उष्णतेपासून दोन दिवसांचा दिलासा
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.