कोलकाता :आर. जी. कार रुग्णालयातीलपीडितेच्या आईने गुरुवारीपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकभाजपची उमेदवार म्हणून लढण्याची इच्छा व्यक्त केली. तृणमूल काँग्रेस सरकारला सत्तेवरून हटवण्यासाठी राजकीय मार्ग निवडत असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील 'पाणिहाटी' मतदारसंघातून त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत त्यांचे नाव समाविष्ट असण्याची शक्यता आहे. यापूर्वी त्यांना भाजपकडून उमेदवारीची विचारणा झाली होती; परंतु त्यावेळी मी मानसिकदृष्ट्या तयार नव्हते, असे त्यांनी म्हटले. राज्य सरकारने माझ्या मुलीच्या प्रकरणातील तपास आणि न्याय प्रक्रियेत अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही त्यांनी केला.पीडितेच्या आईने भाजपकडून आलेली तिकीटाची ऑफर स्वीकारली आणि तृणमूल काँग्रेस तसेच डाव्या पक्षांवर सडकून टीका केली. या दोन्ही पक्षांनी अत्याचार प्रकरणाचा राजकीय गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्यांनी केला आहे.Assam Election: आसाममध्ये काँग्रेसला पुन्हा धक्का! प्रतीक बोरडोलोईंची निवडणूक रिंगणातून माघार, नाकारली उमेदवारीबदल्यांवरून ममतांची टीकाकोलकाता : पश्चिम बंगालमधील ५०हून अधिक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांबद्दलमुख्यमंत्री ममता बॅनर्जीयांनी गुरुवारी तीव्र चिंता व्यक्त केली. हा सर्वोच्च राजकीय हस्तक्षेप आहे, असे त्यांनी म्हटले. निवडणूक आयोगाविरुद्ध टीकेचा सूर त्यांनी कायम ठेवला असून, अशा प्रकारची कृती म्हणजे संस्थांचे राजकीयीकरण आणि संविधानावर केलेला थेट हल्ला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.Delhi Police Tight Security: दिल्लीत कडेकोट बंदोबस्त; ईदच्या पार्श्वभूमीवर तणाव टाळण्यासाठी पोलिस सज्जलोकप्रिय चेहऱ्यांना संधीभाजपने गोवा, नागालैंड, कर्नाटक आणि त्रिपुरा या राज्यांतील विधानसभा पोटनिवडणुकांसाठी गुरुवारी उमेदवारांची घोषणा केली. या पोटनिवडणुकांसाठी पक्षाने लोकप्रिय चेहऱ्यांना संधी दिली आहे.हल्ल्याबाबत अहवाल मागवलाकोलकाता: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या आठवड्यात झालेल्या सभेपूर्वी, तृणमूल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि राज्याच्या मंत्री शशी पांजा यांच्या निवासस्थानावर कथित हल्ला झाल्याप्रकरणी, निवडणूक आयोगाने कोलकाता पोलिसांकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. शहर पोलिसांनी सादर केलेला प्राथमिक अहवाल अपूर्ण असल्याचे आढळून आले; त्यामध्ये या घटनेबाबतचे महत्त्वाचे तपशील समाविष्ट नव्हते. पूर्वीच्या अहवालात घटनाक्रमाचा संपूर्ण वृत्तांत आणि महत्त्वाच्या माहितीचा समावेश नव्हता..
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकः आर. जी. कर रुग्णालयातील पीडितेची आई भाजपकडून निवडणूक लढवणार
Maharashtra Times•
Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.